झक्कास टी हाऊस आणि लक्ष्मी दुग्धालय चे उदघाटन संपन्न…

26

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी. डी.पाटील सर)

धरणगाव(दि.19ऑक्टोबर):-येथील धरणी परिसरात ‘झक्कास टी हाऊस’ आणि ‘लक्ष्मी दुग्धालय’ चे उदघाटन आज दि. १९ ऑक्टोबर २०२१ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात संपन्न झाले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, चहाप्रेमींची चहाची आवड लक्षात घेऊन अस्सल गुळाचा चहा झक्कास टी हाऊस च्या माध्यमातून तसेच दूध व दुग्धजन्य पदार्थ एकाच छताखाली उपलब्ध व्हावेत या हेतूने लक्ष्मी दुग्धालय चे उदघाटन धरणगाव नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी व मान्यवरांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. आज ‘कोजागिरी पौर्णिमा व ईद – ए – मिलाद’ च्या दुग्धशर्करा योगाचे औचित्य साधून दुधात साखर आणि चहा चे मिश्रण एकजीव व्हावे अगदी तशाच प्रकारे या दोन्ही फ्रेंचायजींचा उदघाटन सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी व चहा प्रेमींनी चहाचा आस्वाद घेतला व भरभरून स्तुती केली. त्याचप्रमाणे या दोन्ही फ्रेंचायजींचे प्रो. प्रा. दिपक पाटील व अतुल मराठे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी लो. नगराध्यक्ष निलेश चौधरी, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चंदन पाटील, पाटील समाजाचे अध्यक्ष भिमराज पाटील, प्रगतिशील शेतकरी गोपाल पाटील, विकल्प ऑर्गनायझेशन चे अध्यक्ष प्रा. रविंद्र मराठे, कार्याध्यक्ष लक्ष्मण पाटील, सौरभ कृषी केंद्रांचे संचालक योगेशभाऊ राजपूत, सामाजिक कार्यकर्ते सिताराम मराठे, आनंद पाटील, भूषण पाटील, सचिन पाटील, गोपाल पाटील, राहुल पाटील, भैय्या पाटील, आनंद पाटील, भुषण पाटील, जितू महाराज, संतोष मराठे, दिपक मराठे, राजूदादा चौधरी, समद भाई, निसारदादा खाटीक, गफ्फार दादा, युनूस शेख, असलम भाई, शिवरत्न पवार, महेश चौधरी, विशाल चौधरी, अंकित मालपुरे, मनिष चौधरी, लोकेश जाला, शुभम मराठे, अतुल मराठे, राहुल मराठे, मुकेश पाटील, रोहन मराठे, आकाश मराठे, चेतन पाटील, सोनू चौधरी, कल्पेश मराठे, दर्शन शिरसाठ आदी मान्यवर उपस्थित होते