आगामी निवडणुकीसाठी माण तालुका वंचितची मोर्चेबांधणी सुरु: युवराज भोसले

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.20ऑक्टोबर):-आगामी येऊ घातलेल्या जिल्हा परिषद , पंचायत समिती तसेच नगरपालीका आणि नगरपंचायत निवडणूकी च्या अनूषंगाने माण तालुका वंचित बुजन आघाडी च्या वतीने मोर्चे बांधणीला सुरवात करण्यात आल्याचे वडगाव तालुका माण येथे महत्वपूर्ण बैठक झाल्याचे माण तालुका वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष युवराज भोसले यांनी सांगितले.यावेळी वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्ह्याचे जेष्ठ नेते तसेच वंचित बहुजन आघाडी पाश्चिम महाराष्ट्र समन्वयक चंद्रकांत खंडाईत यांचे मार्गदशनाखाली माण तालुक्यात येणाऱ्या निवडणूकी संदर्भात मार्गदर्शन पर सह विचार सभा आज संपन्न झाली.

या बैठकीत चंद्रकात खंडाईत यांनी बैठकीस उपस्थित प्रमुख कार्यकर्त्यांना आणि पदाधिकारी यांना आगामी येऊ घातलेल्या निवडणुकीसाठी मार्गदर्शन केले आणि पक्षाची रणनीती काय असणार यावर चर्चा केली.सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत तनमनधनाने सामोरे जावे गरजेचे असल्याचे खंडाईत यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष गणेश कारंडे, जिल्हा उपाध्यक्ष सुभाषराव गायकवाड , जिल्हा सचिव सुनिल कदम , माण तालुका अध्यक्ष युवराज भोसले, माण तालुका युवक आघाडी अध्यक्ष रणजित सरतापे, माण तालुका कोषाध्यक्ष संतोष घाडगे, स. सचिव बंटी खरात, दहिवडी शहर अध्यक्ष राजू आवटे, खटाव तालुका उपाध्यक्ष कृष्णत केंजळे, माण तालुका उपाध्यक्ष संतोष पारसे ,सुनिल माने , स्वप्निल भोकरे , युवा आघाडीचे महावीर सावंत ,आबा बनसोडे ,रणजित खरात , महेंद्र गोरेआदि पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थीत होते .वडगाव तालुका माण या ठीकाणी वंचित बहुजन आघाडीचे सल्लागार माजी सरपंच मधुकर खरात यांनी सहभोजनासह या मिटींगचे नियोजन अगदी व्यवस्थीत पणे पार पाडले

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED