ईद-ए-मिलाद या सणानिमित्त रक्तदान शिबीर

🔹रक्तदान शिबिरात राष्ट्र सेवा दलाचा विशेष सहभाग

✒️संदिप सोनवणे(विशेष प्रतिनिधी,येवला)मो:-९६०४१६२७४०

येवला(दि.20ऑक्टोबर):- ईद-ए-मिलाद या मुस्लिम बांधवांच्या पवित्र सणानिमित्त अझहरभाई शहा, नदीम अन्सारी, शहर-ए-काझी काझी सलिम उद्दीन निजभाई, जमीर अन्सारी, अकबर शहा, अब्दुल रहीम मेहवी, निसारभाई निंबूवाले, दादाभाई आदींनी येवले शहरात महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंञी तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना. छगनराव भुजबळ यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते.

त्याच्या उदघाटन प्रसंगी ना.छगनराव भुजबळ साहेबांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे, जिल्हा बॅंकेचे अॅड.माणिकराव शिंदे, प्रा.अर्जुन कोकाटे, दिनकर दाणे व अन्य मान्यवर उपस्थित होते. या रक्तदान शिबिरात राष्ट्र सेवा दलाचाही सहभाग होता. सेवा दलाच्या पाच कार्यकर्त्यांनी यावेळी रक्तदान केले. दुपारी साडेबारा वाजेपर्यंत १०१ बाटल्या रक्त रक्तदात्यांनी दिले होते.

महाराष्ट्र, सामाजिक , स्वास्थ 
©️ALL RIGHT RESERVED