शनिवारी बीड येथे होणाऱ्या ना.छगन भुजबळ व पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीतील कृतज्ञता मेळाव्यास उपस्थित रहावे – तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ बोडखे

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.20ऑक्टोबर):-इतर मागास प्रवर्गाच्या (ओबीसी समाजाच्या) राजकीय आरक्षणाचा अध्यादेश काढून महाविकास आघाडी सरकारने ओबीसींच्या राजकीय आरक्षणास संरक्षण दिल्याबद्दल महाविकास आघाडी सरकारचे आणि हा अध्यादेश काढण्यासाठी सातत्यपूर्वक पाठपुरावा करणारे अखिल भारतीय म.फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष ना.छगनराव भुजबळ यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शनिवार दि.२३ ऑक्टोबर रोजी दपारी १ वाजता बीड शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि अ.भा.म.फुले समता परिषदेच्यावतीने विभागीय अध्यक्ष ॲड.सुभाष राऊत यांच्या नेतृत्वाखाली हा कृतज्ञता मेळावा होत आहे.या मेळाव्यास जिल्ह्यातील ओबीसी समाज बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अ.भा.म.फुले समता परिषदेचे आष्टी तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ बोडखे यांनी केले आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात बोडखे यांनी म्हटले आहे की,ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द करण्यात आले होते मात्र ओबीसी समाजाचे नेते ना.छगनराव भुजबळ यांच्या पाठपुराव्यामुळे महाविकास आघाडी सरकारने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा अध्यादेश काढून संरक्षण दिल्याने ओबीसी समाजाला पुन्हा राजकीय आरक्षणाचा फायदा घेता येणार आहे.ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा अध्यादेश काढल्याबद्दल बीड येथे ना.छगनराव भुजबळ आणि महाविकास आघाडी सरकारचे आभार व्यक्त करण्यासाठी कृतज्ञता मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे.

या कृतज्ञता मेळाव्याचे उद्घाटन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना.छगनराव भुजबळ यांच्या हस्ते होणार आहे.मेळाव्याचे अध्यक्षस्थानी राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे हे राहणार आहेत.प्रमुख पाहुणे म्हणुन आ.संदीप क्षीरसागर,आ.प्रकाश सोळंके,आ.बाळासाहेब आजबे,माजी आ.अमरसिंह पंडित,आ.संजय दौंड,समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ,राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर काळबुधे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख,समता परिषदेचे नाशिकचे जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे,समता परिषद महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा सौ.मंजिरीताई घाडगे,परीट धोबी सेवा मंडळाचे गणेश जगताप,समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस रवी सोनवणे आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED