ऊसतोडीला निघालेल्या ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी, एक महिन्याच्या चिमुरड्याचा जागीच मृत्यू

28

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.21ऑक्टोबर):- जिल्ह्यातून दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठ्याकडे ऊसतोडीसाठी मजुरांना घेऊन निघालेल्या ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी होऊन झालेल्या अपघातामध्ये एक महिन्याचे लहान बाळ मृत्यू झाले, तर सात जण गंभीर जखमी झाले आहे.

ही दुर्दैवी घटना मोहोळ – नरखेड रस्त्यावर मोहोळ गावच्या हद्दीत काल सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. भंडारकवठे साखर कारखान्याकडे भरधाव वेगाने जात असणारी ट्रॅक्टर अचानकपणे चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॉली पलटी झाली अन् दुर्दैवी प्रसंग ओढवला.

यामध्ये अर्णव चव्हाण हा एक महिन्याचा बालक जागीच ठार झाला, तर उषा चव्हाण यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या अपघातप्रकरणी ट्रॅक्टरचालक सचिन साळुंखे यांच्याविरोधात मृत बालकाचे आजोबा धनु चव्हाण यांच्या फिर्यादीवरून मोहोळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.