इंधन दरवाढीच्या निषेधार्थ केंद्रसरकारच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आष्टीत जन आक्रोश आंदोलन

28

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.21ऑक्टोबर):-इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे.या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे.या पेट्रोल,डिझेल आणि गॅस दरवाढी विरोधात आज दि.२१ ऑक्टोबर रोजी आष्टी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने गाड्या ढकलत आणून मोदी सरकारचा निषेध नोंदवून जन आक्रोश आंदोलन करण्यात आले.यावेळी तहसिलदार बाळदत्त मोरे यांना निवेदन देण्यात आले,यावेळी इंधन दरवाढ कमी झालीच पाहिजे,माणुसकी गेली संपावर अच्छे दिन पंपावर अशा मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.मागील काही दिवसांपासून इंधनाच्या दरात वाढ सुरुच आहे.वाढत्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांना जगणं मुश्कील झाले आहे.त्यातच गॅसच्या दरात मोठी वाढ झाल्याने गोरगरीबांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.

मोदी सरकारने इंधनाचे दर कमी करावेत या मागणीसाठी आ.बाळासाहेब आजबे यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब घुले व युवा नेते यश आजबे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर केंद्र सरकारच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला.आष्टी शहरातील किनारा चौक आ.बाळासाहेब आजबे यांच्या कार्यालयापासून पायी मोर्चा तहसिल पर्यंत काढण्यात आला.शेकडो कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावर धडक मारली.यावेळी कार्यकर्त्यांनी मोटारसायकल ढकलून इंधन दरवाढीचा निषेध केला.

यावेळी डॉ.शिवाजी राऊत,तालुकाध्यक्ष आण्णासाहेब चौधरी,युवा नेते यश आजबे,युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब गर्जे,जिल्हा सरचिटणीस सुरेश पवार,महादेव डोके,जगन्नाथ ढोबळे,जालिंदर वांढरे,पं.स.सदस्य संदिप आस्वर,सावता परिषदेचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब वाघुले,बबन काळे,भारत भवर,शौकत पठाण,आजिनाथ गळगटे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.