राष्ट्रवादी काँग्रेस तेल्हारा शहर अध्यक्ष यांचा वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश…

32

✒️विशेष प्रतिनिधी(समाधान गायकवाड)

तेल्हारा(दि.२२आक्टोंबर):-तेल्हारा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष मो.सलीम मो. युनुस यांनी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व स्विकारून जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांच्या हस्ते वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश केला. यामुळे तेल्हारा शहरात वंचित बहुजन आघाडी ची ताकद वाढली असुन असंख्य कार्यकर्ते सुध्दा वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश घेण्यासाठी तयार आहेत.

यावेळी लाल खा पठाण,फीरोज खान केलेवाले,शेख ताजुद्दीन यांचा सुध्दा वंचित मध्ये प्रवेश झाला आहे.यावेळी वंचित बहुजन आघाडी तेल्हारा शहर अध्यक्ष विकास पवार,भारीप बमसं तेल्हारा महासचिव अशोक दारोकार, गजानन गवई, विजय तायडे, पुरषोत्तम अहिर, प्रभाकर अवचार, शंकरराव राजुस्कर,विक्कि तायडे, गजानन तायडे प्रामुख्याने उपस्थित होते