विनायक विज्ञान महाविद्यालय येथे कोविड-19 लसीकरण शिबीर संपन्न

31

✒️प्रदिप रघुते(अमरावती प्रतिनिधी)मो:-9049587193

नांदगाव खंडेश्वर(दि.23ऑक्टोबर):- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्न, प्रविण खोडके मेमोरियल ट्रस्ट द्वारा संचालित विनायक विज्ञान महाविद्यालय नांदगाव खंडेश्वर येथे राष्ट्रीय सेवा योजना, शारीरिक शिक्षण विभाग, राष्ट्रीय छात्र सेना आणि ग्रामीण रुग्णालय नांदगाव खंडेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांकरीता कोविड -19 लसीकरण शिबिराचे शुक्रवार दिनांक २२ ऑक्टोबर २०२१ रोजी आयोजन करण्यात आले.महाराष्ट्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये नियमित प्रवेश देण्याकरिता विद्यार्थ्यांचे लसीकरण झालेले असणे अनिवार्य आहे.

त्यादृष्टीने महाविद्यालयात शिक्षक, शिक्षकत्तर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विनायक विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अलका भिसे यांच्या मार्गदर्शनात कोविड -19 लसीकरण शिबिराचे आयोजन महाविद्यालयामध्ये केले गेले. शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना संस्थेचे उपाध्यक्ष तथा IQAC समन्वयक डॉ. सुचिता खोडके यांनी सांगितले की, कोविड -19 च्या संघर्ष काळामध्ये महाविद्यालयाने वेळोवेळी जनजागृती उपक्रम राबविले. याच पार्श्वभूमीवर आज महाविद्यालयात लसीकरण शिबिराचे आयोजन करून विद्यार्थ्यांना सुरक्षा कवच प्रदान करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत.

यामुळे कोविड -19 च्या नियमाचे पालन करून विद्यार्थी नियमित महाविद्यालयात हजर राहू शकतील.
लसीकरण शिबिराकरिता नांदगाव खंडेश्वर ग्रामीण रुग्णालयाचे श्री आर. इ. मेश्राम (आरोग्य सहाय्यक), श्री एस डी बारब्दे (आरोग्य सेवक), प्रणाली नांदेश्वर (परिचारिका), भूषण भोयर (बेरीफायर ) हे उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाचे प्रा. निशांत जयस्वाल, डॉ. कविता काकडे, डॉ. श्याम दळवी, डॉ. प्रशांत खरात, डॉ. दशरथ काळे आणि सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी शिबिराच्या यशस्वितेकरिता प्रयत्न केले.