प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने सन्मान स्त्री शक्तीचा, गौरव कर्तृत्ववाचा सन्मान सोहळा संपन्न

27

✒️पिंपरी चिंचवड(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पिंपरी चिंचवड(दि.23ऑक्टोबर):- प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पिंपरी aचिंचवडच्य वतीने सन्मान स्त्री शक्तीचा, गौरव कर्तृत्ववाचा सन्मान सोहळा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत दि.२१ ऑक्टोबर २०२१ रोजी संपन्न झाला.याप्रसंगी पिंपरी चिंचवडच्या महापौर माई ढोरे, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष शहाजी भोसले, महिला शहराध्यक्षा तसेच आभा न्यूजच्या संपादिका मंदाताई बनसोडे, नगरसेविका अनुराधाताई गोरखे, माधवीताई राजापुरे, संघाचे उपाध्यक्ष पंकज गवळी, ओमकार दाते, आदी पदाधिकारी, पत्रकार व महिला उपस्थित होत्या.

स्त्री शक्ती सर्व क्षेत्रात प्राविण्य मिळवून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून समाजात कार्य करीत आहेत. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने हा सन्मान सोहळा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, पिंपरी चिंचवड आणि आभा न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. आज स्त्रिया मर्यादित न राहता विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत आहेत. अशा उल्लेखनीय कार्य करणाऱ्या स्त्रियांचा गौरव व सन्मान झाला पाहिजे या उद्देशाने हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.

यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पिंपरी चिंचवडच्या वतीने कर्तुत्ववान स्त्रियांचा गौरव व सन्मान करण्यात आला.
यावेळी पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषाताई उर्फ माई ढोरे, नगरसेविका अनुराधाताई गोरखे, नगरसेविका माधवीताई राजापूरे, तसेच शिक्षण क्षेत्रात नाव कमावलेल्या आणि वैमानिकाची पदवी प्राप्त केलेल्या आदिती कटारे यांच्या आई वडिलांचा सन्मान करण्यात आला. प्रशासनातील अभियंता सुरेखा कुलकर्णी, डॉक्टर संगीता उके यांचा आरोग्य क्षेत्रातील कामगिरीबद्दल सन्मान करण्यात आला, तसेच पत्रकार संगीता पाचंगे, पत्रकार सुचिता तुरुकमारे, पत्रकार स्नेहा साळवे, पत्रकार माधुरी कोराड यांचा पत्रकारितेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्मानचिन्ह, शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, पिंपरी चिंचवडच्या कार्यकारिणीने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान केल्याबद्दल संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, राज्य संपर्क प्रमुख रमेश मोपकर, राज्य महिलाध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे, राज्य कार्यकारिणी, विभागीय कार्यकारिणी, जिल्हा कार्यकारिणी व तालुका पदाधिकाऱ्यांनी विशेष कौतुक केले आहे.