महाआघाडीच्या नेत्यांना अडकवण्यासाठी भाजपची सात महिन्यांपूर्वीच बैठक झाली होती – आ रोहित पवार

30

✒️जगदीश का. काशिकर(विशेष प्रतिनिधी)मो:-९७६८४२५७५७

मुंबई(दि.23ऑक्टोबर):- राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांकडून सुरू असलेली कारवाई ही राजकीय आकसाने करण्यात येत आहे. ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसेआणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना देखील नाहक त्रास दिला जात आहे. असे सांगत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी या पार्श्वभूमीवर मोठा गौप्यस्फोट केला. सहा ते सात महिन्यांपूर्वी भाजपच्या नेत्यांची बैठक झाली होती. त्यात महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून कारवाई करता येईल. याबाबत रणनीती आखण्यात आली होती, असा दावा रोहित पवार यांनी केला. ते जळगावात बोलत होते.

आ.रोहित पवार काल जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या वेळी ते बोलत होते. साधारण सहा ते सात महिन्यांपूर्वी भाजपच्या नेत्यांची मोठी बैठक झाली. या बैठरीत महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून काय कारवाई करता येईल, याबाबत रणनीती आखण्यात आली. त्यानंतर भाजप नेत्यांनी केंद्र सरकारला पत्र दिले होते. त्यानंतर मंत्र्यांवर ईडी व सीबीआयच्या कारवाया सुरु झाल्या, असे रोहित पवार यांनी सांगितले. केंद्र सरकारकडून राज्य सरकारचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप आ. रोहित पवार यांनी केला.