आमदाराच्या खुर्चीवर बसून काय उपयोग.. अन्यथा राजीनामा देणार – आ. लक्ष्मण पवार

28

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.23ऑक्टोबर):-महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंत्रालयात येतच नाहीत. त्यामुळं भेटायचं कस? असा सवाल भाजपाचे आमदार लक्ष्मण पवार यांनी उपस्थित केला आहे. अतिवृष्टी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्ना बाबतीत मुख्यमंत्र्यांना भेटायला वेळ नाही. तसेच या संदर्भात गांभीर्य देखील नाही.कोरोनाचे कारण दाखवून अधिवेशनही झाले नाही, तर लोकप्रतिनिधी म्हणून आमचा काय उपयोग आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सुटत नसतील तर खुर्चीवर बसून काय उपयोग ? प्रश्न सुटले नाही तर राजीनामा देणार आहे. असं म्हणत खंत देखील त्यांनी व्यक्त केली. बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राज्याचे मुख्यमंत्री हे मंत्रालयात येतच नाहीत, त्याना भेटायचं असेल तर मातोश्री किंवा वर्षा बंगल्यावर जावं लागतं. भेटायला गेले तर आमदार असलो तरी आतून कॉल आल्याशिवाय भेटता येत नाही, म्हणून अद्याप एकदाही भेट झाली नाही. परतीचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नुकसान भरपाई संदर्भात पॅकेज जाहीर केले. त्यात पंचनामा ही अट घातली. शेतकऱ्यांना किमान 40 हजार प्रतिहेक्टरी तरी मदत द्यायला पाहिजे. एकट्या गेवराई तालुक्यात जमीन खरडून गेली आहे. त्यांचे पंचनामे झाले आहेत.

4 हजार हेक्टर जमीन बाधित आहे, राज्य सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधकार मय होणार आहे. दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांना मदत खात्यात जमा करा. ही दिवाळी गोड कशी होणार याची चिंता लागली आहे. विना फटाके विना दिवे अंधकारमय दिवाळी आहे. असं देखील आमदार पवार म्हणाले. तसेच शेतकऱ्याला मदत मिळवून देण्यासाठी उपोषण करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. लोकप्रतिनिधी असून देखील जर माझ्याकडून शेतकऱ्यांचे आणि सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवता येत नसतील तर शेवटी आमदारकीचा राजीनामा दिलेला बरा. अशी देखील खोचक खंत पवार यांनी व्यक्त केली.