गडचिरोली येथे श्री शिवशंभू ऐतिहासिक लेखी परीक्षा 2021संपन्न

27

🔸शिवचरित्राचा अभ्यास पेपर पुरता मर्यादित न ठेवता जीवनात सुद्धा अंगीकृत करा. – अनुप कोहळे

✒️रोशन मदनकर(गडचिरोली प्रतिनिधी)

गडचिरोली(दि.24ऑक्टोबर):- स्वराज्य प्रतिष्ठान संचालित, आळंदी ते किल्ले श्री रायगड पालखी सोहळा समिती च्या वतीने दि.24-10-2021 रोजी सम्पूर्ण महराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित श्री शिवशंभू ऐतिहासिक लेखी परिक्षेचे आयोजन करण्यात आले असून 3500 हजार स्पर्धकांनी यात सहभागी झाले होते.

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यच्या ठिकाणी या परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून गडचिरोली जिल्ह्यात अ.भा.वि.प. च्या मुख्यालयात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी स्पर्धेचे उद्घाटक तथा केंद्र प्रमुख म्हणून अनुप कोहळे यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन करतांना म्हटले की शिवचरित्राचा अभ्यास पेपर पुरता मर्यादित न ठेवता जीवनात सुद्धा अंगीकृत करा.

व शिवरायांचे मावळे म्हणून आज च्या युगातील गडकोट किल्ले काय आहेत ते ओळखा व शिवरायांना अभिप्रेत राज्य निर्माण करण्यात हातभार लावा. यावेळी कार्यक्रमाला पर्यवेक्षक म्हणून अभिषेक देवर, अजय सोमनकर उपस्थित होते. गडचिरोली जिल्ह्यातील सम्पूर्ण स्पर्धेचे व कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या जिल्हा युवती प्रमुख संतोषी सुत्रपवार यांनी केले होते.