विमा कंपनी विरुद्ध न्यायालय लढाई लढणार – आमदार रत्नाकर गुट्टे

25

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.24ऑक्टोबर):-यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे विशेषता सप्टेंबर महिन्यात तीन वेळा अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक जमिनीही वाहून गेल्या पावसामुळे खरीप पिकाचे नुकसान झाले असून पीक कापणी प्रयोग महसूल विभाग व विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सक्षम करण्यात आले होते परंतु आपल्या शेतकऱ्याला विमा द्यावा लागतो असे स्पष्ट दिसत असतानाच विमा कंपनीने मात्र विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींना दमदाटी करून हवे तसेच पंचनामे करून घेतली असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी यांच्याकडे आक्षेपा द्वारे केल्या होत्या.

परंतु जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी विमा कंपनीच्या तक्रारी फेटाळून लावल्याचे कळाले मात्र विमा कंपनीच्यावतीने विभागीय आयुक्ताकडे पुन्हा तक्रार करणार असल्याची माहिती मिळाली आहे परंतु आपण शेतकऱ्याच्या हिताला प्रथम प्राधान्य देत त्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी सर्व स्थरावरून प्रयत्न करून वेळ प्रसंगी विमा कंपनी च्या विरोदात न्यायालीन लढाई देखील लढू आसा निर्धार आमदार रत्नाकर गुट्टे यांनी व्यक्त केला आहे या वर्षी सप्टेंबरमहिन्यात तब्बल तीन वेळा अतिवृष्टी झाली असून या मुळे शेतकऱ्याच्या शेतातील सोयाबीन, कापूस, ऊस, तूर, मूग, आधी पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले.

असून सर्व नदी नाल्याना पूर आल्या मुळे जमिनी खरडून गेल्या असून अनेकांच्या घरात पाणी शिरून त्यांचे नुकसान झाले असून हे सर्व नुकसान मी स्वताहा जाउन पहिले आहे नुकसान झालेल्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळणे आवश्यक आहे या साठी विमा कंपनी कडून पाहिजे तसें सहकार्य मिळत नसून केवळ प्रीमियम भरून घ्यायचा व विमा द्यायचा नाही. विमा कंपनी शेतकऱ्याच्या हिताला बाधक ठरणारे निर्णय विमा कंपनी घेत आहे. गंगाखेड मतदार संघातील पीक विमा, प्रयोग विमा, कंपनीचे प्रतिनिधी, महसूल व कृषी विभागातील कर्मचारी शेतकरी तलाठी, पोलीस पाटील, सरपंच यांच्या समोर करण्यात आला असून परंतु पीक कापणी प्रयोग करते वेळेस मात्र विमा कंपनी ने कोणताही अक्षेप घेतला नाही परंतु विमा द्यावा लागतो हे वरिष्ठ अधिकाऱ्याच्या लक्षात येताच विमा देण्याची वेळ येवू नये या साठी प्रोयोग केलेल्या अधिकाऱ्यांना खोटे अक्षेप जिल्हाधिकारी यांच्या कडे नोंदवण्यास सांगितले परंतु केवळ सर्व अभ्यास करून आपल्याला पिक विमा द्यावा लागतो.

हे लक्षात येताच अक्षेप घेण्यास सुरवात केली विमा कंपनीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्याकडे आमच्यावर दबाव टाकून पंचनामे करून घेतल्याची तक्रार दाखल केली असता जिल्हाधिकाऱ्यानी ही तक्रार फेटाळून लावल्या असून आता विमा कंपनी विभागीय आयुक्ताकडे तक्रार करणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. हा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांना त्याच्या हक्काची भरपाई पासून वंचित ठेवण्याचा घाट रचला जात आहे. या मुळे आपण शेतकऱ्याच्या सोबत कायम असून शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी कट्टीबद आहे.जिल्हाधिकारंच्या या आदेशा नंतर वेळ प्रसंगी न्यायालीन लढाई, तसेच रस्त्यावर उतरून आंदोलन करू आसा निर्धार आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी व्यक्त केला आहे