✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.25ऑक्टोबर):-६५ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन व महाकवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने महाराष्ट्र कलावंत हक्क समिती जिल्हा यवतमाळच्या वतीने
कलावंत एकता परिषद व सांस्कृतिक कार्यक्रम
दि. २४ ऑक्टोंबर २०२१ रोजी पुसद तालुक्यातील चार्वाक वन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.विलास भवरे हे होते. उद्घाटक म्हणून ॲड.अप्पाराव मैंद तर प्रमुख पाहुणे म्हणून द ग्रेट तथागत वेबसिरीजचे दिग्दर्शक सुनील राजेकुंभार,सहाय्यक गटविकास अधिकारी प.स.पुसद शिवाजी गवई ,जि.प.सदस्य भोलानाथ कांबळे,गिता मेश्राम, जिल्हाध्यक्ष प्रा. जनार्दन गजभिये ,विशाल भगत ,स्वागताध्यक्ष प्रा. सुधीर गोटे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. प्रा.सुधीर गोटे यांनी शब्द सुमनाने स्वागत केले.अँड .अप्पाराव मैंद व शिवाजी गवई यांनी कलावंताना शुभेच्छा देऊन मोलाचे मार्गदर्शन केले.

यावेळी ॲड.अप्पाराव मैंद,रमेश राऊत,गणेश धर्माळे,सुरेश कांबळे, यांचा सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी नवनियुक्त कलावंतांना नियुक्त्यी पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी प्रकाशदादा करमकर,सुप्रसिद्ध गायक मेश्राम, धम्मदिक्षा वाहुळे,सुनील पाझारे, पंडित कांबळे, ज्ञानेश्वर ताकतोडे, राहुल गरडे,राष्ट्रीय दिव्यांग संघ,दळवी सर,सदानंद तायडे, संतोष गायकवाड, मुकिंदा ढोले,ईत्यादी कलावंतांनी गायनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. जनार्धन गजभिये, सुरेश कांबळे ,प्रफुल भालेराव, राज वाढे, राजू मंदाडे, अरुण मुनेश्वर ,मधुकर सोनुने,भिमराव शेजे तसेच महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती जिल्हा यवतमाळ पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल भालेराव यांनी केले तर आभार सुरेश कांबळे यांनी मानले.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED