नाशिक मखमलाबाद शिवारात तुडुंब भरलेल्या विहिरीत मृतावस्थेत आढळला बिबट्या

24

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

नाशिक(दि.26ऑक्टोबर):-मखमलाबाद शिवारातील धात्रक मळा परिसरात असलेल्या एका तुडुंब भरलेल्या विरीत आज दुपारी एक बिबट्या मृतावस्थेत स्थानिक शेतकऱ्यांना आढळून आला यावेळी त्यांनी तात्काळ वनविभागाला माहिती दिली त्यानंतर वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले .

त्यांनी बिबट्याचा मृतदेह सुरक्षितपणे विहिरीतून बाहेर काढला त्यानंतर मृतदेहाचे पशु वैद्यकीय अधिकारी यांनी रोपवाटिकेत शव विच्छेदन करून अंत्यसंस्कार केले मृतबिबट्या हा मादी असून सुमारे अंदाजीत तीन वर्षे वयाचा असल्याचे समजते