ब्रम्हपुरी येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची होणारी हेळसांड थांबवा

25

🔹अन्यथा युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करणाऱ्याचा श्री प्रकाश खोब्रागडे यांनी दिला इशारा

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.26 ऑक्टोबर):-ब्रम्हपुरी येथे शासकीय ग्रामीण रुग्णालय आहे. याठिकाणी ब्रम्हपुरी शहरासह ग्रामीण भागातील विविध आजारांनी ग्रस्त असलेले नागरिक वैद्यकीय उपचारासाठी येत असतात. उपचारासाठी येणाऱ्यांमध्ये विशेषतः गरीब रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. मात्र रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या अनेक नागरिकांना रुग्णालयातील काही डाॅक्टर व अन्य कर्मचारी यांच्या मुळे रुग्णांची हेळसांड होत असल्याच्या तक्रारी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना प्राप्त झाल्या आहेत.सोबतच गरोदर महिलांना सुध्दा उपचारासाठी व बाळंतपणासाठी ग्रामीण रुग्णालयात आणले जाते.

मात्र बाळंतपणासाठी आणल्या जाणाऱ्या महिलांना रुग्णालयात दाखल करून घेण्यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून अनेकदा टाळाटाळ केली जात असते.त्यामुळे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांनी आपल्या स्तरावर चौकशी करून संबंधित डाॅक्टर व कर्मचारी यांना सुचना द्यावी. अन्यथा युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलनाचा इशारा यावेळी निवेदनाद्वारे युवक काँग्रेसच्या वतीने ब्रम्हपुरी शहर युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश खोब्रागडे यांनी दिला आहे.
निवेदन देतांना युवक काँग्रेसचे ब्रम्हपुरी तालुका अध्यक्ष प्रभाकर उर्फ सोनू नाकतोडे, युवक काँग्रेसचे ब्रम्हपुरी विधानसभा उपाध्यक्ष अमीत कन्नाके,सुरज मेश्राम, युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस रुपेश बानबले, राकेश काटेखाये, अरविंद कुर्झेकर यांसह अन्य पदाधिकारी यांची यावेळी उपस्थिती होती.