आधारभूत खरेदी केंद्रावर नोंदणीची शेवटची संधी

27

🔸त्वरित नोंदणी करा : खरेदी केंद्रांचे आवाहन

✒️नितीन पाटील(विशेष प्रतिनिधी)

नेरी(दि.27ऑक्टोबर):-शासनाने शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा व शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून होणारी लूट थांबावी याकरिता आधारभूत खरेदी योजना सुरू केली. यात शेतकऱ्यांना शासनाला धान विक्री कारायची असल्यास आधारभूत खरेदी केंद्रात आगावू नोंदणी करणे आवश्यक आहे.आधारभूत खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी नोंदमी करण्याची तारीख 15 ऑक्टोबर ठेवली होती परंतु नोंदणी प्रक्रिया करताना अद्यावत सातबारा नसणे, लिंक तसेच विविध समस्या येत असल्याने शेतकऱ्यांचे प्रतिसाद अत्यल्प होता.

त्यामुळे NEML पोर्टल वर अल्प प्रमाणात नोंदणी झाल्यात. याचे गंभीर्यलक्षता घेता आधारभूत खरेदी केंद्रांनी नोंदणीची तारीख वाढवावी अशी मागणी केली तसेच शेतकरी यांनी सुद्धा विविध मार्गाने नोंदणीची तारीख वाढवावी यासाठी प्रयत्न केले.
या शेतकरी व आधारभूत खरेदी केंद्र यांच्या मागणीचा विचार करत आधारभूत केंद्रावर शेतकरी नोंदणी प्रक्रिया ची मुदत व 31 ऑक्टोबर पर्यंत मुदत वाढविली आहे मात्र ही शेवटची संधी असल्याचे परिपत्रकात नोंद असल्याने 31 ऑक्टोबर नंतर खरेदी केंद्रावर नोंदणी करता येणार नसल्याने अजूनपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी आधारभूत खरेदी केंद्रावर नोंदणी केली नाही.

अश्यानी त्वरित जवळच्या केंद्रावर जाऊन नोंदणी करावी असे आवाहन आधारभूत केंद्रांनी केले आहे. नोंदणीला शेवटचे पाच दिवस शिल्लक राहिले आहेत जे शेतकरी ऑनलाईन नोंदणी करणार नाहीत त्यांना खरेदी केंद्रावर धान्य नेता येणार नाही आणि त्यांच्या धान्याची खरेदी होणार नाही.त्यामुळे NEML वर नोंदणी करण्यासाठी ही शेवटची संधी असल्यामुळे तसेच यानंतर नोंदणीला मुदत वाढ मिळणार नसल्यामुळे शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणी करावी असे आवाहन खरेदी केंद्रांनी केले आहे.