अज्ञान वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार कोमलवाडी फाट्यावर जागीच ठार

25

🔺गेवराई – चकलांबा रोडवरील घटना

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.27ऑक्टोबर): – चकलांबा रोडवर कोमलवाडी फाट्यावर अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात अंबादास कदम (वय ४२, रा. माटेगाव, ता. गेवराई) यांचा जागीच दुदैवी मृत्यू झाला. मंगळवारी रोजी संध्याकाळी ७ च्या दरम्यान हा अपघात झाला. अंबादास कदम मोटारसायकलीने गेवराईकडे येत असताना भरधाव येणाऱ्या अज्ञान वाहनाने कोमलवाडी फाट्यावर मोटारसायकलला जोरदार धडक दिली. कदम यांचा डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांनी फोनवरून संपर्क करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर गावकऱ्यांनी व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली,परंतु त्याचा जागीच मृत्यु झाला होता, त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून उत्तरीय तपासणी करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय गेवराई येथे दाखल करण्यात आले

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अंबादास कदम हे मुळचे माटेगाव येथील रहिवासी असून ते गेवराई शहरात स्थाईक होते, मंगळवारी रोजी ते शेतातील कामासाठी आले होते. शेतातील काम उरकून कदम हे सांयकाळी आपल्या दुचाकीवरून गेवराईकडे येत होते. यावेळी कोमलवाडी फाट्यावर त्यांच्या दुचाकीला अज्ञान वाहनाने धडक दिल्याने अंबादास कदम यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला. मागील काही महिन्यांपूर्वी देवपिंप्री येथील तरुणाचा देखील त्याच जागेवर अपघातात मृत्यू झाला होता. घटनास्थळी पोलीसांनी धाव घेऊन कदम यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रूग्णालय गेवराई येथे दाखल करण्यात आला