रा. तु. महाविद्यालयात वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची पुण्यतिथी साजरी

27

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.28ऑक्टोबर):-गांधी सेवा शिक्षण समिती चिमूर द्वारा संचालित राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय चिमूर येथे महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्ष व आजादी का अमृत महोत्सवाच्या निमित्ताने वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची पुण्यतिथी दरवर्षी साध्या पद्धतीने साजरी करण्यात येत होती. परंतु यावर्षी प्रथमच महाविद्यालयाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने वं. तुकडोजी महाराजांची ५३ वी पुण्यतिथी महोत्सव महाविद्यालयात मोठ्या थाटामाटात, उत्साहात साजरी करण्यात आली.

वंदनीय तुकडोजी महाराजांनी आपल्या खंजेरी भजनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन व राष्ट्रीयत्वाची भावना जागृत करणारे व विश्वबंधुत्वाचा संदेश चिमूर परिसरातील खेड्यापाड्यात पोहचविला. यावर्षी कोविड नियमाच्या अधीन राहून गुरुदेवभक्त, गांधी सेवा शिक्षण समितीचे अध्यक्ष, सचिव, पदाधिकारी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत ४.५८ मिनिटांनी गुरुमाऊलीला मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या पुण्यतिथीनिमित्य महाविद्यालयात सकाळपासूनच स्वच्छता अभियान, प्लाँस्टिक निर्मूलन, कोविड लसीकरण ची जनजागृती तसेच वंदनीय तुकडोजी महाराजांच्या जीवनावर प्रकाश मार्गदर्शन मान्यवरांनी केले. भजन कीर्तनाच्या माध्यमातून वंदनीय तुकडोजी महाराजांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

याप्रसंगी गांधी सेवा शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉ. दिपक यावले, सचिव विनायकराव कापसे, महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य प्रा. कार्तिक पाटील, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व गुरुदेवभक्त यांच्या उपस्थितीत वंदनीय तुकडोजी महाराजांचा ५३ वा पुण्यतिथी महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.