रा. तु. महाविद्यालयात “स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा” निमित्त कायद्याविषयी पथनाट्यातून जनजागृती

32

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.28ऑक्टोबर):-गांधी सेवा शिक्षण समिती चिमूर द्वारा संचालित राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय चिमूर येथे दि. २७ ऑक्टोंबर २०२१ रोजी विधी सेवा समिती चिमूर तसेच महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, राष्ट्रीय छात्र सेना, विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “आजादी का अमृत महोत्सव” आणि विधी सेवा सप्ताह दिनांक २ ऑक्टोबर २०२१ ते १४ नोव्हेंबर २०२१ यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश रवींद्र भेंडे यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष अँड. संजीवनी सातारडे, प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य प्रा. कार्तिक पाटील, उपप्राचार्य प्रा. डॉ. प्रफुल बन्सोड, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. हरेश गजभीये, अँड. गुणवंत अगडे, अँड. सुभाष नन्नावरे, अँड. शैनेशचंद्र श्रीरामे व महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते.

या कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली. तसेच संविधानातील विविध तरतुदी, शिक्षणाचा अधिकार, स्त्रियांचे अधिकार, दुर्बल घटकांचे अधिकार अशा विविध विषयांना अनुसरून जनजागृती नाटक, मनोगते, तथा गीते महाविद्यालयातील विद्यार्थांनी सादर केली. विधी सेवा समितीचे वतीने उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

सदर कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, रासेयो विभागीय समन्वयक तथा कार्यक्रम अधिकारी प्रा. पितांबर पिसे, कार्यक्रम अधिकारी प्रा. गुणवंत वाघमारे, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, राष्ट्रीय छात्रसेना कॅडेट कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन प्रा. पितांबर पिसे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. गुणवंत वाघमारे यांनी मानले. या कार्यक्रमातून महाविद्यालयीन विद्यार्थांना विविध कायद्याविषयी मार्गदर्शन उपस्थित मान्यवरांनी केले.