✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.28ऑक्टोबर):-वीस वर्षापासून सेवा करणारा कर्मचारी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या करतोय हे शासनाचे दुर्दैव आहे. तात्काळ उपाययोजना करून या आत्महत्या थांबाव्यात असा आवाहन सखाराम बोबडे पडेगावकर यांनी गुरुवारी केले.गंगाखेड बसस्थानकासमोर एसटी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी सकाळी उपोषण सुरू केलं .या उपोषणास सखाराम बोबडे पडेगावकर, ह भ प शिवाजी महाराज बोबडे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांना जाहीर पाठिंबा व्यक्त केला.

व त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या .आज पर्यंत 35 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या असून तशी दुर्दैवाची घटना किमान परभणी लोकसभा मतदारसंघात तरी घडू नये अशी काळजी आपण घ्यावी असे आवाहनही त्यांनी केलं. यासंदर्भात लवकरच मा जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या मागण्या त्यांच्याकडे लेखी कळवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी एसटी महामंडळाचे उपोषण करते कर्मचारी उपस्थित होते. बोबडे यांनी दिलेल्या पाठिंब्याच एसटी कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED