🔹भंडारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकणार – चरण वाघमारे

🔸भंडारा तालुक्यातील धारगाव जिल्हा परिषद क्षेत्रातील भाजपचा कार्यकर्ता मेळावा संपन्न

✒️चक्रधर मेश्राम(विशेष प्रतिनिधी)

भंडारा(दि.29ऑक्टोबर):-स्वतःच्या नाकर्तेपणामुळे तोंड दाखविण्यास जागा नसल्याने हे सरकार निवडणुकांपासून दूर पळते आहे. सत्तेत आल्यापासून शेतकरी असो वा सर्वसामान्य नागरिक सर्वांच्या अपेक्षा भंग करून वाऱ्यावर सोडणाऱ्या सत्ताधाऱ्यांना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जागा दाखविण्यासाठी हा नाकर्तेपणा जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम भाजपच्या कार्यकर्त्यांनी करावे असे आवाहन खासदार सुनील मेंढे यांनी केले. जिल्हा परिषद क्षेत्र कार्यकर्ता मेळावा च्या पार्श्वभूमीवर भंडारा तालुक्यातील धारगाव जिल्हा परिषद क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला खासदार संबोधित करीत होते. यावेळी मंचावर प्रामुख्याने माजी आमदार चरण वाघमारे, जिल्हाध्यक्ष शिवराम गिऱ्हेपुंजे, जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र निंबार्ते, नितीन कडव, महामंत्री प्रशांत खोब्रागडे, तालुका अध्यक्ष विनोद बांते, क्षेत्र प्रमुख रमेश चावरे, बालू मस्के, टेकराम पडोळे, सरपंच संध्या निंबार्ते, रजनी मोटघरे, अंजली वासनिक, नीलकंठ कायते आदी उपस्थित होते.

कोरोनाच्या काळात पुढे येऊन मदत करण्याऐवजी मोठमोठ्या गोष्टी सांगितल्या गेल्या. सर्वसामान्यांच्या मदतीला केंद्र सरकार आले. मग ते गरजूंच्या खात्यात टाकलेला निधी असो किंवा दिलेले मोफत धान्य आणि राज्य सरकारने मागील दीड वर्षाच्या काळात केवळ शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांची थट्टाच केली आहे.केंद्र शासनाच्या योजनाही लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम आपल्याला करायचे आहे.मोदीजी नी जनधन खाते उघडायला लावले पण त्यांना माहित नव्हते की कोरोना येईल पण जनधन खात्यामुळे कोरोना काळात जे महिलाच्या जनधन खात्यात पाचशे रुपये आले त्यामुळे त्यांच्या परिवाराला आधार मिळाला तसेच महाआघाडी सरकारने कोरोना काळात ज्या इलेक्ट्रिक लाईन कापल्या त्यामुळे शेतकऱ्यांचे व सर्वसामान्य जनतेचे हाल झाले आपले सरकार होते.

त्यावेळेस असं काहीच केले नाही, सर्वसामान्य आणि गरीब अशा सर्व लोकांना केंद्रस्थानी ठेवून या योजनांची आखणी करण्यात आली आहे. मग ती उज्वला गॅस योजना, जनधन योजना, ई श्रम कार्ड योजना अथवा प्रधानमंत्री आवास योजना असेल.सर्व योजनांमधून लोकांचे कल्याण साधण्याचा प्रयत्न पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांनी केला आहे. राज्य सरकारकडे सांगायला काहीच नसल्याने लोकांपर्यंत निवडणुकीच्या काळात काय घेऊन जावे हा प्रश्न आघाडीतील सर्व पक्षांपुढे आहे, याचा परिणाम जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबणीवर टाकला जात आहे. कोरोना असतानाही अन्य निवडणुका होऊ शकतात मग भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या का नाही असा प्रश्न उपस्थित करीत खासदारांनी आघाडी सरकारच्या मनातील वास्तव उघड केले. सरकारचा नाकर्तेपणा घेऊन प्रत्येक कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागात जावे. मोदी सरकारच्या कल्याणकारी योजना ही लोकांपर्यंत पोहोचवून आगामी निवडणुकांमध्ये विजय संपादन करण्याचा निर्धार करावा असे आवाहन खा. सुनील मेंढे यांनी केले.

भंडारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकणार असल्याचे माजी खासदार चरण वाघमारे म्हणाले. पुढे बोलतांना ते म्हणाले कि, अनेकदा चांगल्या योजना राज्य शासनाच्या लेटलतिफशाही मुळे अडचणीत येतात. आधारभूत धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून खरेदी केलेल्या धानाचा हिशोब राज्याने केंद्राकडे पाठविल्यानंतर ताबडतोब केंद्राकडून राज्याला पैसे दिले जातात. राज्य शासनाच्या उदासीन धोरणामुळे ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास प्रचंड विलंब लागतो असा आरोप यावेळी चरण वाघमारे यांनी राज्य शासनावर केला.धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिला जात असलेला त्रास कमी नाही. अजूनही बोनस आणि चुकाराचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाही. कर्जमाफीची घोषणा करणाऱ्या सरकारने प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर राशी देण्याचे सांगितले खरे मात्र अजून पर्यंत हे प्रोत्साहन शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नाही. आणि दुसरीकडे भाजपचा कार्यकर्ता सामान्य जनतेचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरतो त्यामुळे भंडारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकणारच असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे संचालन महेंद्र निंबार्ते तर आभार प्रदर्शन टेकाराम पडोळे यांनी केले. मेळाव्याला प्रामुख्याने शंकर लोले, प्रमोद झंझाड, उमेश मोहतुरे, ओमप्रकाश गिऱ्हेपुंजे, देवचंद निंबार्ते, रवींद्र सार्वे, नितेश गोंधुळे, भीमराव शेंद्रे, मंगेश निंबार्ते, विनोद कोकोडे, गोपाल रेहपाडे, सुरेश बांते, प्रमोद झंझाड, नितेश गोंधुळे, शरद रेहपाडे, शुभम मस्के, दीपक पडोळे, जागेश्वर पाल, सुमित जगनाडे, जनार्धन पेशने, रमेश गोमासे, सौ मानसी रेहपाडे, रामा मडावी, महेश गिऱ्हेपुंजे, श्यामकला उईके, उर्मिला ढोणे आदी उपस्थित होते.अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र निंबार्ते यांनी दिली.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED