विद्यार्थी घडविण्यासाठी शिवाजीराव दादांनी शाळा उभारल्या – साहेबराव पांढरे

33

🔸शाळकरी विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व शालेय साहित्य वाटप करून आदर्श उपक्रम राबवला – युवा नेते दत्ताभाऊ वाघमारे

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.28ऑक्टोबर):- तालुक्यातील जातेगाव येथील यमादेवी माध्यमिक विद्यालयात स्कूल बॅग वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी बोलतांना माजी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव भाऊ पांढरे म्हाणाले की, विद्यार्थी घडविण्यासाठी शिवाजीराव दादांनी शाळा उभारल्या, काॅलाजेस उभारण्यात आले त्यांचा हेतु होता की आपल्या तालुक्यातील विद्यार्थी घडला पाहिजे, यावेळी साहेबराव पांढरे, अध्यक्ष प्राचार्य बाळासाहेब पंडित, प्रमुख पाहुणे साहेबराव पांढरे, शंकरराव पवार, विलासराव चव्हाण, रामेश्वर पवार, अॅड. कल्याण चव्हाण, युवा नेते दत्ताभाऊ वाघमारे, राधेशाम लेंङाळ, विजयसिंह यमगर, राधेशाम धोंडरे, अंकुश धोंडरे, रामेश्वर चव्हाण, जेष्ठ पत्रकार भास्कर सोळंके यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

युवा नेते दत्ताभाऊ वाघमारे यांनी बोलताना सांगितले की माजी आमदार अमरसिंह पंडित बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह राजे पंडित यांनी राजकारणामध्ये शिवाजीराव दादा पंडित यांच्या पावलावर पाऊल टाकून समाजकार्य करत गोरगरीब तालुक्यातील जनतेवर प्रेम केल आहे शाळकरी विद्यार्थ्यांना शिवाजीराव दादा पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त स्कूल बॅग व इतर साहित्य वाटप करून आदर्श उपक्रम राबवला असून हे कार्य कौतुकास्पद आहे असे युवानेते दत्ताभाऊ वाघमारे यांनी यावेळी आवर्जून सांगितले