कै. कैलास अरबड सर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त संघर्ष धान्य बँकेत तीन क्विंटल धान्य जमा

32

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.२९ऑक्टोबर):-आपला प्रिय मित्र या जगात नाही परंतु त्याच्या स्मृती चिरंतन जिवंत राहाव्यात यासाठी जयभवानी बचत गटाच्या सर्व मित्रांनी मिळून मित्राच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अनाथ, वचितासाठी तीन क्विंटल धान्य संघर्ष धान्य बँकेत जमा केले. कै. कैलास अर्बड सर यांच्या अकाली निधनाला आज एक वर्ष पूर्ण झाले. याबद्दल सर्व मित्राच्या मनात अतोनात दुःख आहे. परंतु आपल्या मित्राच्या मृत्यूनंतर त्याच्या स्मृती जिवंत राहाव्यात यासाठी या मित्रांनी जयभवानी बचत गटातून आलेल्या वार्षिक नफ्यातून तीन क्विंटल धान्य खरेदी केले व अनाथ वंचितांसाठी काम करत असलेल्या गेवराई येथील संघर्ष धान्य बँकेत हे धान्य जमा केले. आमचे मित्र श्री कैलास अरबड सर हे शिक्षकामधील एक उगवतं नेतृत्व होते त्याचबरोबर ते अत्यंत धाडसी व सर्वांना सोबत घेऊन चालणारे होते.

त्यांच्या जाण्याने शिक्षक बांधवांमध्ये पोकळी निर्माण झालेली आहे अशा भावना श्री पांचाळ सर यांनी व्यक्त केल्या. श्री कैलास अरबड सर हे सर्वसामान्य शिक्षकांचे आधार होते अनेक शिक्षकांना त्यांनी संकट प्रसंगी मदत केली अशा प्रकारच्या भावना श्री सोनटक्के सर यांनी व्यक्त केल्या. कैलास अरबड सर हे माझे घनिष्ठ मित्र होते सरांनी अनेक गोरगरीब वंचितांना मदत केली आहे. त्यांचे हे कार्य अशीच चालू राहावे म्हणून आज त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हे धान्य जमा करत आहोत अशा भावना श्री प्रशांत मस्के सर व चिकणे सर यांनी व्यक्त केल्या. कैलास अर्बड सर ही शिक्षकांमधील उगवते नेतृत्व होते त्यांच्या जाण्याने शिक्षक संघटना पोरकी झाली आहे अशा प्रकारच्या भावना श्री संजय पांढरे सर यांनी व्यक्त केल्या. अनेकांना मदत करणारे कैलास अरबड सर नेहमी संघर्ष धान्य बँकेच्या कार्याचे कौतुक करायचे त्यांच्या कौतुकामुळे आम्हाला काम करण्याची प्रेरणा मिळायची अशा भावना धान्य बँकेचे श्री शिवाजी झेंडेकर सर यांनी व्यक्त केल्या.

जय भवानी गटाच्या वतीने वेळोवेळी संघर्ष धान्य बँकेला मदत करण्यात येणार आहे असे आश्र्वासन सर्व सदस्यांनी दिले. बचत गटाच्या सर्व सदस्यांचे आभार श्री शिवाजी झेंडेकर सर व श्री संजय पांढरे सर यांना मानले. याप्रसंगी बचत गटाचे श्री सचिन हुलजुते सर,प्रा. टकले सर,प्रा.पांचाळ सर,प्रशांत मस्के सर, श्री पघळ सर, श्री चिकने सर,श्री प्रशांत चव्हाण सर,श्री आसाराम चादर सर, श्री अनिल सोनटक्के सर,श्री उद्धव क्षिरसागर सर,श्री प्रशांत मुटकुळे सर,श्री बाळासाहेब चौधरी सर,श्री शिवाजी झेंडेकर सर,श्री संजय पांढरे सर उपस्थित होते.