NPS योजना रद्द करून जुनी पेन्शन लागू करण्याबाबत शिक्षक भारतीचे मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांना निवेदन

29

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.29ऑक्टोबर):-दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पासून महाराष्ट्र शासनाने परिभाषित अंशदायी पेन्शन योजना व 2015 नंतर रूपांतरित झालेली राष्ट्रीय पेन्शन योजना राज्यातील कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आली आहे. परंतु ही योजना कर्मचाऱ्यांना लाभदायक नाही.

सेवेत असतांना अकाली निधन झालेल्या सुमारे 1600 कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय आर्थिक बाबतीत पूर्ण उध्वस्त झालेले असून राज्यातील संबंधित कुटुंबीय कुटुंब निवृत्ती वेतन, ग्रॅज्युटी व इतर अनुषंगिक लाभ दिले गेलेले नाहीत .गेल्या 16 वर्षात केंद्र शासनाने या एन. पी.एस.योजनेत काही कालसुसंगत बदल केले आहेत. त्या संदर्भात महाराष्ट्र राज्य शासनाने अद्याप दखल घेतलेली नाही .त्यामुळे राज्यातील 45 टक्के असणारे एन.पी.एस धारक वर्गीय कर्मचारी कमालीचे संतप्त आहेत.
जुनी पेन्शन योजना सर्वांना लाभदायक ठरत असल्याने नवी पेन्शन योजना रद्द करावी व जुनी पेन्शन योजना लागू करावी.

या मागणीसाठी आज ठिय्या आंदोलनात राज्य सरकारी, जि. प. कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी,शिक्षक, शिक्षकेतर ,चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांनी पेन्शनची मागणी करण्यासाठी शासनाचा लक्षवेध करण्यासाठी ठिय्या आंदोलन करून ‘राष्ट्रीय पेन्शन योजना हटवा दिन’ तहसील कार्यालय ब्रम्हपुरी च्या परिसरात पाळला .
या वेळी आपल्या मागण्यांचे निवेदन शिक्षक भारती संघटना शाखा ब्रम्हपुरी च्या वतीने निवेदन देताना जिल्हा संघटक तथा नागपूर विभाग साहप्रसिद्धी प्रमुख श्री सतिश डांगे सर , प्राथमिक विभागाचे तालुका अध्यक्ष श्री राजेश धोंगडे , माध्यमिक चे जिल्हा उपाध्यक्ष श्री. प्रशांत सुरपाम, प्राथमिक चे तालुका सचिव भाऊराव आठोळे सर , आश्रमशाळा विभाग चे जिल्हा उपाध्यक्ष श्री. तुळशीदास प्रधान सर, माध्यमिक चे तालुका अध्यक्ष श्री हनवते सर, ,शिक्षक भारती चे ब्रम्हपुरी तालुका कोषाध्यक्ष श्री प्रशांत घुटके सर, श्री.गोपाल राऊत सर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.