✒️जगदीश का.काशिकर(विशेष प्रतिनिधी)मो:-९७६८४२५७५७

सोलापूर(दि.30ऑक्टोबर):-सोलापुरातील सेटलमेंट येथील अंदाजे 70 एकर जागेवर विमुक्त समाजाची गृहनिर्माण सोसायटी निर्माण व्हावी यासाठी माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि आ. प्रणितीताई शिंदे यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला होता. सदर जागा विमुक्तांच्या गृहनिर्माण संस्थेसाठी ६५ एकर व ५ एकर जागा स्मृतीस्तंभास माणुसकी प्रतिष्ठानला देण्याबाबत मदत व पुनर्वसन मंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी विमुक्त समाजाच्या प्रमुखांच्या बैठकीत घेतला. याबाबत सोलापूरचे जिल्हाधिकारी मा.मिलिंद शंभरकर यांना मंत्रीमहोदयांनी फोन आदेश देऊन प्रस्ताव सादर करण्यास सांगितले.

या बैठकीत भटके-विमुक्त जमातीचे नेते भारत माणिक जाधव,शंकर जाधव,पारूबाई काळे, नागनाथ गायकवाड,महेश काळे, कविता चव्हाण यांच्यासह ओबीसी व्हिजेएनटी समन्वय समितीचे अरुण खरमाटे प्रा.सुशीला मोराळे, बापू विभुते प्रकाश राठोड, हसीब नदाफ उपस्थित होते.सदर निर्णयामुळे विमुक्त समाजामध्ये आनंदाचे वातावरण असून मंत्री महोदयांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे.या महत्वाच्या निर्णयानंतर सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश वाले यांनी मा.ना.विजय वडेट्टीवार यांचे हार्दिक आभार व्यक्त केले आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED