देगलूर बिलोली विधानसभा निवडणुकीत म.वि.आ.ला ऐतिहासिक यश

28

✒️नायगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

देगलूर(दि.3नोव्हेंबर):- बिलोली विधानसभा निवडणुकीत म.वि.आ.ला ऐतिहासिक यश मिळाले,मतदारसंघातील जनतेने विजयाचे खरे शिल्पकार लोकनेते मा.ना.अशोकराव चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य तथा नांदेड जिल्हा पालकमंत्री यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा प्रचंड विश्वास ठेवून काँग्रेसचे जितेश अंतापूरकरांना लक्षवेधी बहूमताने विजयी केले.त्याप्रसंगी मा.ना.श्री अशोकराव चव्हाण हे विजयी सभेस देगलूर येथे जात असताना नायगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संभाजी पाटील भिलवंडे यांनी त्यांचे नरसी शहरात ढोलताशे व फटाक्यांच्या आतषबाजीत जंगी स्वागत करून सत्कार केला.

यावेळी सरपंच गजानन पाटील भिलवंडे,तालुका मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष अनिल कांबळे,कृ.उ.बा.स.मा.संचालक नजीरसेठ बागवान,वसिमबेग पटेल,यु.काँग्रेसचे शहराध्यक्ष जब्बार खान,बालाजी पाटील भिलवंडे,सोसायटीचे संचालक रामराव मावले, बाबू पटेल कुंचोलीकर,बालाजी मेटकर,पिराजी पवार,सुधारक पाटील भिलवंडे,इरफान कुरेशी,नज़ीरसाब शेख,खालेद मिर्झा, चंद्रशेखर भिलवंडे,संतोष कुडके,फडके साहेब,राजू सुर्यवंशी,विजय सुर्यवंशी,सय्यद इसरत,मोबीनसेठ बेकरीवाले,गणेश भुताळे, मधुकर ताटे,लालबाजी सुर्यवंशीसह मान्यवरांसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.