शेतकऱ्यांचा राजा महात्मा बळीराजास विनम्र अभिवादन!

30

🔸महात्मा बळीराजा हेच आपले दैवत आहे – धर्मराज पाटील[ शेतकरी]

✒️पी.डी पाटील(धरणगाव प्रतिनिधी)

धरणगांव(दि.5नोव्हेंबर):- धरणगाव येथील सुवर्ण महोत्सवी शाळा – महात्मा फुले हायस्कूल येथील उपक्रमशिल शिक्षक पी.डी.पाटील सर यांनी आपल्या गावी मांदुर्णे, ता. ४० गांव येथे आपल्या कुटुंबीयांसोबत जगाचा पोशिंदा, लोककल्याणकारी महात्मा बळीराजा यांच्या स्मृतिदिनानिमित्त सहकुटुंब विनम्र अभिवादन केले.याप्रसंगी वडील धर्मराज पुंडलिक पाटील यांनी सपत्नीक महात्मा बळीराजा व राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पूजन केले.

पी.डी.पाटील यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबाला महात्मा बळीराजायांचा जीवन संघर्ष व कार्याचा परिचय दिला. आपल्या शेतकरी कुटुंबाचे दैवत लोककल्याणकारी राजा, जगाचा पोशिंदा, महात्मा बळीराजा हेच होय. जीवनात या थोर महापुरुषांचे विचारच आपल्याला तारतील असे प्रतिपादन केले.याप्रसंगी वडील धर्मराज पुंडलिक पाटील, आई सुंदरबाई धर्मराज पाटील, पत्नी वेणु पाटील, लहान बहीण पद्मिनी माळी, लहान बंधू निलेश पाटील [ प्रा.शि.] , प्रा.पंकज पाटील व परिवारातील सर्व लहान बाल – गोपाल मंडळी उपस्थित होते.