मांदुर्णे गावात लोककल्याणकारी महात्मा बळीराजा गौरव दिनानिमित्त विनम्र अभिवादन…..

38

🔸कृषिप्रधान देशात शेतकऱ्याची अवस्था दुर्दैवी – सरपंच दगडू गणपत पाटील

✒️विशेष प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

मांदुर्णे, ता. चाळीसगांव(दि.5नोव्हेंबर):- २०२१ शुक्रवार रोजी चाळीसगाव तालुक्यातील मांदुर्णे गावात ग्रामपंचायत मांदुर्णे यांच्याकडुन शेतीवर नित्तांत प्रेम करणारे, जगाचा पोशिंदा, लोककल्याणकारी महात्मा बळीराजा गौरव दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांदुर्णे येथील शेतकरी पुत्र प्रमोद पाटील यांनी केले. प्रास्ताविकात महात्मा बळीराजा यांच्या काळात शेतकरी अतिशय सुखी व समाधानी होता. लोककल्याणकारी राजा म्हणून बळीराजाची ख्याती होती म्हणून आज दिवाळी सणामध्ये घराघरातील माता-भगिनी म्हणतात – ” इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो ” अशा महान राजाच्या कार्याबद्दल ग्रामस्थांना विस्तृत अशी माहिती सांगितली.

या बळीराजा लोकोत्सव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. सुनंदाबाई दगडू पाटील होत्या. याप्रसंगी ग्रामपंचायत मांदुर्णे येथील विद्यमान सरपंच सौ. सुनंदाबाई दगडू पाटील, दगडू गणपत पाटील, उपसरपंच सौ. मंगलाबाई नामदेव पाटील नामदेव माधवराव पाटील या शेतकरी दांपत्याच्या हस्ते महात्मा बळीराजाचे प्रतिमापूजन करण्यात आले.

याप्रसंगी बळीराजाची आठवण यावी म्हणून मांदुर्णे गावातील शेतकरी धर्मराज पुंडलिक पाटील यांची गाडी बैल व नांगर झेंडूच्या फुलांनी सजविण्यात आला. या बैलजोडी व नांगराचे पूजन मा.प.स.सदस्य संभाजीराजे पाटील, ता.सरचिटणीस भा.ज.पा.अमोल दादा चव्हाण, सायगांवचे उपसरपंच गोकुळ रामराव रोकडे, पिलखोडचे सरपंच प्रकाश यशोध, उपसरपंच गोकुळ रामचंद्र बाविस्कर, उपखेडचे सरपंच महेश संभाजी मगर, मारुती भास्कर काळे, दिनेश नाना महाजन, सरपंच उपसरपंच व सर्व ग्रामस्थ यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यानंतर दगडू गणपत पाटील यांनी महात्मा बळीराजा यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. बळीराजा आपले दैवत आहेत त्यांची संस्कृती आपण जोपासली पाहिजे. कृषिप्रधान देशात शेतकऱ्याची अवस्था दुर्दैवी झाली आहे. पुन्हा बळीराजाचे राज्य यावे अशी अपेक्षा व्यक्त करत सर्व बांधवांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. उपखेडचे सरपंच महेश मगर यांनी शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवून शेतकऱ्याला उभे केले पाहिजे. अमोल दादा चव्हाण यांनी शेतकऱ्याने कच्च्या मालापासून पक्का माल तयार करून बाजारात विकून स्वावलंबी झाले पाहिजे. संभाजीराजे पाटील यांनी शेतकऱ्यांनी आधुनिक शेती करून मोठे व्हावे असे मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

यानंतर ग्रामपंचायत मांदुर्णे यांच्या वतीने सर्व सन्माननीय अतिथी गण व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या शुभहस्ते गावातील उपस्थित शेतकरी बांधवांना लोककल्याणकारी महात्मा बळीराजा, व संत महापुरुषांचे १०० ग्रंथांचे वितरण करण्यात आले.

याप्रसंगी मांदुर्णे गावातील उपसरपंच नामदेव माधवराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र सुभाष पाटील, गोरख आत्माराम पाटील, लक्ष्‍मण जगन्‍नाथ पाटील, कैलास परशराम पाटील, आनंदा सावजी पाटील, अन्वर गंभीर मन्सुरी ,ईश्वर पोपट मोरे, धोंडू जंगलु भिल, शिवाजी दामू माळी, हरुण जैनुद्दीन मन्सुरी व गावातील समस्त शेतकरी बहुजन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .

या बळीराजा महोत्सवाचे सुत्रसंचलन सत्यशोधक परिषदेचे सदस्य प्रमोद पाटील सर यांनी तर आभार ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र सुभाष पाटील यांनी मानले.

या बळीराजा लोकत्सव गौरव दिन यशस्वीतेसाठी ग्रामसेवक दिलीपअहिरे भाऊसाहेब, दगडू उत्तम पाटील, विकास मन्साराम पाटील, राजेश दगडू पाटील, गोरक भास्कर पाटील, पंकज धर्मराज पाटील, रघुनाथ शंकर माळी, दीपक बळीराम महाजन व संपूर्ण ग्रामपंचायत मांदुर्णे येथील सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.