एस.टी. कर्मचारी संपाला वंचित बहुजन आघाडी चा जाहिर पाठिंबा

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.6नोव्हेंबर):-महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप चालू आहे तरीही याकडे सरकारचे मुळीच लक्ष नाही.दि.३०/१०/२०२१ पासून रापम कर्मचारी संपावर आहेत. मागील अनेक वर्षांपासून कर्मचाऱ्यांच्या न्यायोचित मागण्या शासनाकडे प्रलंबित आहेत.

त्यात प्रामुख्याने एस. टी.कामगारांना समान काम समान दाम या तत्त्वावर किमान वेतन कायद्यानुसार १एप्रिल २०१६ पासून १८०००/-रुपये मूळवेतन मिळणे, सातव्या वेतन आयोगानुसार रापम कर्मचाऱ्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार श्रेणी लागू करणे,अर्थसंकल्पात समावेश करणे,महामंडळाचे शासनात विलिनीकरण करणे परंतु अजून पावेतो संबंधितांनी लक्ष न दिल्याने आणि दळणवळण बंद असल्याने अनेक समस्यांना सहन करावे लागते आहे. शासन प्रशासनातील संबंधितांनी आता तरी या कडे लक्ष दयावे.

जर मागण्या मान्य झाल्या नाही तर कर्मचारी कोणते पाऊल उचलतील हे आत्ताच नक्की सांगता येत नाही.
वंचित बहुजन आघाडी चिमूर तालुक्याच्या वतीने एका पत्रकाद्वारे रापम कर्मचाऱ्यांच्या या संपाला पाठिंबा जाहीर केला आहे.या प्रसंगी वंचित बहुजन आघाडी चे चंद्रपूर जिल्हा सदस्य मा.स्नेहदिप खोब्रागडे,चिमूर तालुका अध्यक्ष मा.नितेश श्रीरामे,चिमूर शहर अध्यक्ष मा.शालिक थुल, चिमूर तालुका उपाध्यक्ष मा.डी. के.नागदेवते सर,चिमूर तालुका महासचिव मा.लालाजी मेश्राम,चिमूर शहर उपाध्यक्ष मनोज राऊत,भाग्यवान नंदेश्वर, आकाश भगत आदि उपस्थित मान्यवर होते.

महाराष्ट्र, विदर्भ, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED