माजी उपसरपंचा सह एकावर अॕट्रासिटी अॕक्टनुसार गुन्हा दाखल

27

🔹जिवती तालुक्यातील आंबेझरी येथील घटना

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.8नोव्हेंबर):- तालुक्यातील आंबेझरी येते लहान मुलांच्या झगड्यावरून अश्शिल व जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना घडली असून माजी उपसरपंच रामराव पांडूरंग राठोड व त्याचा भाऊ माधव पांडूरंग राठोड यांच्या विरोधात पिटीगुडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार तक्रारदारांच्या घरासमोरील सार्वजनिक रस्त्यावर मुले खेळत असताना वाद झाला लहान मुलांच्या झगड्यावरून आंबेझरी ग्रामपंचायत ते माजी उपसरपंच रामराव राठोड व त्याचा भाऊ माधव पांडूरंग राठोड या दोघांनीही तुमच्या मुलांना शाळा शिकविण्याची औकात आहे का.तुमची लायकी आहे का आमच्या सोबत राहण्याची.तुमच्या मुलांना शाळेत सुध्दा येवू देणार नाही.

अश्शिल व जातिवाचक शिविगाळ केले असे तक्रारीत नमुद असून फिर्यादीच्या तक्रारीवरून दोघां भावाविरूध्द कलमा नुसार 294, 506 भादवी सह कलम 3(1), 3(2) अनु. जाती, अनु जमाती ( अत्याचार प्रतिबंधक)अधि.1989 सुधारित 2015, जिवती तालुक्यातील पिट्टीगुडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.सदर घटनेचा तपास पोलिस उप निरिक्षक शरद आवारे करित आहे.