नक्षलवाद्यांनी पेरुन ठेवलेले विस्फोटके केले जप्त

31

🔹गोंदिया जिल्हा पोलीसांची यशस्वी कामगिरी

🔸मोठे घातपात करण्याचे नक्षलवाद्यांचे प्रयत्न?

✒️गडचिरोली प्रतिनिधी(चक्रधर मेश्राम)

गडचिरोली(दि.8नोव्हेंबर):- रोजी नक्षल सेल गोंदिया यांना गुप्त माहितीच्या आधारावर पोलीस स्टेशन सालेकसा अंतर्गत सशस्त्र दुरक्षेत्र दर्रेकसा जंगल परिसरात घातपात घडवून आणुन पोलीसांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने नक्षलवाद्यांनी स्फोटक साहित्य पेरुन ठेवलेले होते.

अशी माहिती मिळाल्याने त्या माहितीच्या अनुषंगाने विश्व पानसरे पोलीस अधीक्षक गोंदिया, जालींदर नालकुल उपविभागीय पोलीस अधिकारी आमगाव, यांच्या मार्गदर्शनात नक्षल सेल गोंदिया चे अधिकारी व अंमलदार, सी – ६० गोंदिया व सी -६० सालेकसा येथील कमांडो पथक व बी.डी.डी.एस. पथक गोंदिया यांनी गडमाता पहाडी – बेवारटोला डॅम जवळील जंगल परिसरात सर्च ऑपरेशन राबवुन गडमाता पहाडी चे भागात संशयास्पद वस्तु आढळुन आल्याने श्वान पथक व बी.डी.डी.एस. पथकाचे सहाय्याने खबरदारीच्या उपाययोजना करुन पाहणी केली असता नक्षलवाद्यांनी घातपात घडवुन आणुन पोलीसांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी स्फोटके साहीत्य लपवुन ठेवल्याचे दिसुन आले.

सदर स्फोटक साहीत्य बी.डी.डी.एस पथकाच्या मदतीने बाहेर काढले असता बऱ्याच प्रमाणात साहित्य आढळून आले. त्यात १) हिरवा लालसर रंगाचा दोन कोर अंदाजे, २) बॅटरी काळया रंगाची १ फैडिबल इलेक्ट्रीक वायर ८० फुट, ३) जिलेटीन कांडया ८ नग, ४) इलेक्ट्रीक डिटोनेटर वायरसह ११५ नॉन इलेक्ट्रीक डिटोनेटर ०३६ प्रिंटेड सर्किट बोर्ड (PCB) २७ चाकु २, ८) ७.६२ एमएम राऊंड, ५ ) ( SLR चे असावेत) राऊंड, ६) प्रिंटेड सर्किट बोर्ड (PCB) २, ७) चाकु २, ८) ७.६२ एमएम राऊंड ५ (SLR चे असावेत) राऊंड, ९ ) गावठी बंदुकीच्या राऊंड २, १०) ७.६२ एमएम राऊंड ११(AKM रायफल चे असावेत) राऊंड, ११) मेडीसीन ठेवलेला प्लास्टीक डब्बा १, १२) हिरव्या रंगाची स्फोटक सदृश ७०० ओलसर पावडर ग्रॅम १३ ) जुन्या वापरत्या पिस्टल सारख्या दिसणारे २, १४ ) जुन्या वापरते देशी कट्टे ०२ अग्नीशस्त्र मॅगझीन सह, १५) २० लिटर क्षमतेचे स्टिल ड्रम १, १६) राखडी रंगाचे स्फोटक सदृश ७०० पावडर ग्रॅम, १७) गडद हिरव्यास रंगाचे कापड नक्षलवाद्यांचे गणवेषाचे सदर साहीत्य जप्त करण्यात आले.

असुन पो.स्टे. सालेकसा येथे गु.र.नं. २६१/२०२१ कलम ३०७, १२० भादवी सहकलम १३,१८,२०,२३ यु.ए.पी.ए. सहकलम ४, ५ भारतीय स्फोटक पदार्थ कायदा सहकलम ३/२५ भारतीय हत्यार कायदा अन्वये नक्षलवाद्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास उपविभागीय पोलीस अधीकारी, आमगाव जालींदर नालकुल हे करीत आहेत, सदर ची कारवाई विश्व पानसरे, पोलीस अधीक्षक, गोंदिया यांचे मार्गदर्शनात, जालींदर नालकुल, उपविभागीय पोलीस अधिकारी आमगाव, पो.नि. तायडे व अंमलदार नक्षल सेल गोंदिया, 1 सी -६० कमांडो पथक गोंदिया, सी -६० कमांडो पथक सालेकसा, बिडीडीएस व श्वान पथक गोंदिया चे अधिकारी व अंमलदार यांनी केली असुन कारवाई मध्ये सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक, गोंदिया यांनी अभिनंदन केले आहे.