रुग्णसेवा हीच दिवाळी… मात्र रुग्णसेवा देणारी 108 ऐन दिवाळीच्या दिवसात पडली आजारी?

28

🔸ॲंबुलन्स ठेवून चालक बेपत्ता?

🔹आरोग्य प्रशासनाचे दुर्लक्ष की चलते है चलने दो चे धोरण?

✒️प्रतिनिधी गडचिरोली(चक्रधर मेश्राम)

गडचिरोली(दि.8नोव्हेंबर):- जिल्ह्यातील अनेक रुग्णालय प्रशासनाने प्रशंसनीय उपक्रम राबविले असले तरी काही बाबतीत आरोग्य प्रशासन ढीले , कमकूवत झाले असल्याचे निदर्शनास आले आहे. जनतेला उत्तरदायी आणि दर्जेदार सेवा उपलब्ध व्हावी यासाठी शासनाने ॲंबुलंन्स च्या सेवा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. मात्र आरोग्य प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने सेवा देणाऱ्या ॲंबुलंन्स भर रस्त्यावर बंद पडतात. आणि अशा प्रसंगी रूग्णालयात वेळेत पोहचवण्यास अडसर निर्माण होतो. असाच प्रकार दिनांक 7 नोव्हेंबर 2021 रोजी देऊळगाव किटाळी जवळ घडला असल्याचे निदर्शनास आले आहे.

इतकेच नाही तर चालकाने ती ॲंबुलंन्स ( क्रमांक MH- 14 – CL 0540) तिथेच ठेवून बेपत्ता झाले असल्याचे आमच्या प्रतिनिधीला प्रत्यक्षदर्शी दिसून आले. बंद अवस्थेत रस्त्यावर उभ्या असलेल्या ॲंबुलंन्स जवळ कोणीतरी येणार आणि वास्तविक माहिती मिळणार म्हणून आमचे प्रतिनिधी तब्बल एक तास वाट पहात बसले मात्र तिथे कोणीही फिरकले नाही. यावरून जनहितार्थ असलेल्या शासनाच्या वस्तुंची किती निष्काळजीपणा, दुर्लक्ष केले जात असावे हे निदर्शनास येते. तर दुसरीकडे प्रसिद्धी मिळवून घेण्यात धन्यता मिळविण्याचे शुल्लक कार्यक्रमाचे आयोजनही दिवाळीच्या पर्वावर करण्यात आले.

आणि जिल्हा सामान्य रूग्णालय गडचिरोली येथे दिवाळी साजरी करण्यात आली.यावर्षी दिवाळी सणाच्या दिवशी रुग्णालयच आपले घर आहे व रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा समजून रुग्णांना फराळ आणि फळं वाटण्यात आले.या कार्यक्रमा प्रसंगी जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथील रुग्णालयीन कर्मचारी व अधिकारी यांचे सह जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल जे. रुडे व डॉ. धुर्वे निवासी वैदयकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. . परंतु त्या ॲंबुलंन्स जवळ मात्र कित्येक वेळपर्यंत कोणीही फिरकले नाही. याचे नवल वाटते.