स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी धडक मोर्चाचे आयोजन

33

🔹मोर्चामध्ये शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने सामील व्हावे – अनिल माने

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो.9823995466

उमरखेड(दि 9 नोव्हेंबर):-चालू खरीप हंगाम 2021 – 22 मध्ये ओला दुष्काळ व अतिवृष्टीने संपूर्ण राज्यात सह जिल्ह्यात पावसाने हाहाकार उडाला या अतिवृष्टीत शेतकरी आर्थिक दृष्ट्या उध्वस्त झालेला आहे शेतमाल, शेती याचं कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे उमरखेड, महागाव तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस मान होऊन सर्व रेकॉर्ड तोडले गेले आहे यामध्ये पशूधन मानव हानी मोठ्या प्रमाणावर झालेली आहे.

महाविकास आघाडी राज्य शासनाने सबंधित अतिवृष्टी साठी जाहीर केलेली आर्थिक मदत अत्यंत अल्प व तोकडी असून तुटपुंजी आहे त्यामुळे महा विकास आघाडी राज्य शासनाने वाढीव मदत या बाधित शेतकऱ्यांना देण्यात यावी यासाठी बुधवार दिनांक 10 नोव्हेंबर रोजी उमरखेड उपविभागीय कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रणित स्वाभिमानी पक्षाचे उमरखेड तालुका अध्यक्ष अनिल माने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

या मोर्चामध्ये प्रमुख मागण्या यवतमाळ जिल्ह्यासह उमरखेड व महागाव तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून जाहीर झालेली दुष्काळी आर्थिक मदतीसाठी पात्र करण्यात यावे व ही मदत सरसकट देण्यात यावी, नांदेड पॅटर्नच्या धर्तीवर यवतमाळ जिल्ह्यातील शेतकर्‍यांना पंतप्रधान पीक विम्याचा सरसकट लाभ देण्यात यावा, चालू खरीप हंगाम 2021–22 व झालेल्या ढगफुटी सारख्या पाऊस व अतिवृष्टी ओल्या दुष्काळामध्ये मध्ये नदी-नाला ओढ्या काठच्या ज्या विहिरी खचल्या गेल्या पडझड झाली अशा विहिरींना दुरुस्ती व तात्काळ शासकीय योजनेच्या माध्यमातून नवीन विहीर या शेतकऱ्यांना देण्यात यावी.

चालू रब्बी हंगामाकरिता शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदान तत्त्वावर महाविकासआघाडी राज्य शासनाने महाबीज बियाणे महामंडळ च्या वतीने रब्बी हंगामाकरिता शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदान तत्वावर हरभरा व गहू बी बियाणे खते उपलब्ध करून देण्यात यावी, ओला दुष्काळ अतिवृष्टी मध्ये आर्थिक दृष्ट्या होरपळून निघालेल्या हतबल व हताश असलेल्या शेतकऱ्यांना महा वीज वितरण कंपनीकडून शेतातील वीज तोडणीचे काम युद्ध पातळीवरुन संबंधित विभागाच्या माध्यमातून चालू असून ही वीजजोडणी थांबविण्यात यावी.

या अशा सर्व विधायक शेतकऱ्याच्या हितार्थ असलेल्या संवेदनशील व तत्परतेच्या मागण्या ला घेऊन एल्गार मोर्चे च्या माध्यमातून शासनाला जाब विचारून उत्तर देण्यासाठी भाग पाडायचे आहे त्यासाठी विभागातील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी संघटित होऊन या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून उपस्थित राहावे असे आवाहन मनिष जाधव जिल्हा अध्यक्ष, विश्वास लांडगे जिल्हा कार्य अध्यक्ष, अनिल माने स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रणित स्वाभिमानी पक्ष जिल्हाध्यक्ष यवतमाळ, सखाराम माने बोरीकर ता.अध्यक्ष, अमोल देशमुख ता.अध्यक्ष महागाव. रविंद्र जैन ता. अध्यक्ष उमरखेड, अचल आ. पतंगे ता.ऊ.अध्यक्ष, गोविंदराव सावंत परजनकर कोषाध्यक्ष, सुदर्शन रावते, ढाणकी विभाग प्रमुख , विश्वास पतंगे,व उमरखेड यांनी केले आहे.