जननायक बिरसा मुंडा यांना भारतरत्न सन्मान प्रदान कर प्रदान करण्यात यावा.- डी.बी.अंबुरे

28

✒️विशेष प्रतिनिधी(अमोल जोगदंडे)

आदिवासी समुदायाच्या क्रांतिकारकांनी लढलेल्या समग्र स्वातंत्र्य समराचा समन्वय बिंदू म्हणजे जननायक बिरसा मुंडा होय. आज संपूर्ण भारत देशात आदिवासी अस्मितेचे प्रतीक म्हणून बिरसा मुंडा हे पुढे आले आहे .बिरसा मुंडा ने अठराशे सत्तावन च्या पूर्वी झालेल्या आदिवासी उठावाचे सूत्र पकडून वर्तमानातील अत्याचारांना वाचा फोडीत भविष्याचा वेध घेत आपल्या आंदोलनाला गतिमान केले. बिरसा मुंडा चे आंदोलन सामाजिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक ,अंगाने विकसित झालेले आंदोलन होते.

या भारत मातेच्या क्रांती पुत्राचा सन्मान होणे गरजेचे आहे .आज आदिवासी युवकांचे बिरसा मुंडा एक प्रेरणास्थान आहे. अस्तित्व ,अस्मिता शोधण्याचे प्रबळ कारण आहे ,म्हणून भारत सरकारने 15 नोव्हेंबर 1989 ला बिरसा मुंडा तिकीट काढले 16 ऑक्टोबर 1989 ला बिरसा मुंडा च्या तैलचित्राचे संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये अनावरण केले. एवढेच नाही तर तत्कालीन राष्ट्रपती महामहीम के आर नारायण यांच्या हस्ते 28 ऑगस्ट 1998 ला भारतीय संसदेच्या आवारात बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यावेळेस बोलताना राष्ट्रपती महोदय म्हणाले बिरसा मुंडा एक महान समाजसुधारक, रचनात्मक ,प्रतिभा के धनी थे.और इन् सबसे से अधिक उत्साही राष्ट्रप्रेमी थे एक ऐसा महान स्वातंत्र्य सेनानी जो आंगन की तुलसी के समान हर एक किसिके सहाय्यता के लिए तत्परता था.

सदर निवेदन उपविभागीय अधिकारी उमरखेड यांचेमार्फत पंतप्रधान कार्यालय न्यू दिल्ली यांना देण्यात आले. त्यावेळी बिरसा क्रांती दलाचे राज्य प्रशिक्षक नारायणराव पिलवंड, अशोक ढोले, विठ्ठल पोटे, सुखदेव शेळके बालाजी लांडगेवाड, शेकोरावपिंपळे ,भगवान भिसे ,सतीश मुरमुरे संतोष मेटकर, सुरेंद्र नाथ दळवी, दत्ता मिराशे, संतोष पिंपळे, कामाजी गव्हाळे, अर्जुन वायकुळे, अमोल पिंपळे, सुरेश हातमोडे ,प्रदीप पेजेवाड,अमोल ब्रह्म टेके, मारुती कराळे, बंडू ढाकरे, शेषरावजी इंगळे उपस्थित होते.