उमरखेड येथे उपकार्यकरी अभियंता यांच्या विरुद्ध साखळी बेमुदत उपोषण सुरू

28

🔹भीम टायगर सेना व रिपब्लिकन सेनेचा उपोषणकर्त्यांना जाहीर पाठींबा

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995465

उमरखेड(दि.10नोव्हेंबर) महावितरण कार्यालय उमरखेड येथे श्री. ज्ञानेश्वर मुंडे लाईनमन यांचे उपकार्यकरी अभियंता यांच्या विरुद्ध साखळी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

लाईनमन ज्ञानेश्वर मुळे हे वरिष्ठ तंत्रज्ञ वितरण केंद्र विडुळ येथे माहे सप्टेंबर मध्ये कामावर असतांना सुद्धा त्यांना गैरहजर दाखवून ऐन दिवाळी सणामध्ये पूर्ण पगार दिलाच नाही.

यांची विचारणा दीपक जैन (उपकार्यकरी अभियंता) यांना केली असता उद्धट भाषेत बोलून पगार देण्यास विरोध केला.

यापुढे तुला बघून घेईन असे बोल बोलू लागला. अशा निर्दयी, दडपणाशाही, हुकूमशाही प्रवृत्तीच्या अभियंत्याला जनतेने जाब विचारला पाहिजे..!

या बेमुदत साखळी उपोषणाला भीम टायगर सेना (सामाजिक संघटना) आणि रिपब्लिकन सेना (राजकीय पक्ष) यांनी प्रत्यक्ष भेट देऊन उपोषणकर्त्यांना जाहीर पाठिंबा दर्शविली आहे.
लाईनमन मुंडे यांचा पगार लवकरात लवकर देण्यात यावा..!
अशी मागणी केली आहे.

जर येत्या काही दिवसात अन्याय झालेल्या लाईनमन ला त्यांचा पूर्ण पगार दीपक जैन यांनी दिला नाही तर तीव्र आंदोलन छेडल्या शिवाय राहणार नाही.

वेळप्रसंगी आम्ही कामगारांच्या खंबीरपणे उभे होऊ..!
असा इशारा सिध्दार्थ दिवेकर (शहाराध्यक्ष भीम टायगर सेना) आणि देवानंद पाईकराव (रिपब्लिकन युवासेना) यांनी दिला आहे.

यावेळी सुनिल पाटील चिंचोलकर, कैलास कदम (तालुकाध्यक्ष भीटासे उमरखेड), कुमार केंद्रेकर (तालुका संपर्क प्रमुख उमरखेड), शुद्धोधन दिवेकर (उपशहाराध्यक्ष रि. सेना उमरखेड) इत्यादी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.