गंगाखेड मतदार संघात नियमित विद्युत पुरवठा द्या – आमदार गुट्टे

29

🔸गंगाखेड मतदार संघात सौर ऊर्जा प्रकल्प निर्मिती संदर्भात मुख्यमंत्री, ऊर्जा मंत्री व संबंधित विभागाचे प्रधान सचिवाकडे पत्राद्वारे केली मागणी

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.10नोव्हेंबर):- विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी आपल्या मतदार संघातील कृषीपंप व गावठाणाकरिता नियमित वीज पुरवठा देऊन उपलब्ध गावठाण जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना. उद्धव ठाकरे, ऊर्जामंत्री मा.ना. डॉ. नितीन राऊत व प्रधान सचिव (ऊर्जा) दिनेश वाघमारे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.गंगाखेड मतदार संघातील गंगाखेड, पालम व पूर्णा या तीनही तालुक्यात शेती हा मुख्य व्यवसाय असून बहुतांश भागात काळी कसदार जमिन आहे.

शेती सिंचनाकरिता मुबलक पाणी असूनही केवळ वीज अभावी शेती सिंचन म्हणावे तसे करता येत नसल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होऊन दारिद्र्याची खुणगाठ शेतकऱ्यांच्या कायम पदरी बांधलीजात असल्याने शेतकऱ्यांच्या समस्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कृषीपंपासह गावठाणला ही वीज पुरवठा नियमित देणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर गंगाखेड मतदार संघातील भौगोलिक परिस्थिती पाहता सौर ऊर्जा प्रकल्प उभारून विजेची तूट भरून काढता येऊ शकते.

त्यामुळे मतदार संघातील उपलब्ध हजारो हेक्टर गावठाण जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प उभे करून मतदारसंघातील ऊर्जेचा प्रश्न कायमचा सोडवलं जाऊ शकतो असे मत आमदार गुट्टे यांनी पत्रात व्यक्त केले आहे.आमदार गुट्टे यांनी पत्रात मागणी केल्याप्रमाणे शेतीकरिता नियमित वीज पुरवठा झाल्यास शेतकऱ्यांच्या दरडोई उत्पन्नात निश्चितच वाढ होईल व सौर ऊर्जा प्रकल्प निर्मितीमुळे मतदारसंघातील विजेचा प्रश्न सुटून रोजगार निर्मिती झाल्याने तरुणांच्या हाताला काम मिळे.