किशोर हंबर्डे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवत साजरा होणार – प्राचार्य डॉ.निंबोरे

28

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.10नोव्हेंबर):- तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष किशोर (नाना) हंबर्डे यांचा उद्या दि.११ नोंव्हेबर २०२१ रोजी ५५ वा वाढदिवस.हा वाढदिवस अँड.बी‌.डी.हंबर्डे महाविद्यालयात विविध सामाजिक उपक्रम राबवत साजरा करणार आहेत असे महाविद्यालयांचे प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे यांनी सांगितले.यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की,दरवर्षी महाविद्यालय विविध सामाजिक उपक्रम राबवत असते,त्यातही मा.अध्यक्ष साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही दरवर्षी रक्तदान शिबिर,रूग्णांना व गरजूंना फळे व साहित्य वाटप,विविध क्रिडा स्पर्धा आयोजित करत असतो.याही वर्षी हे सर्व उपक्रम आम्ही राबवत आहोत.

रक्त संकलनासाठी अहमदनगर येथील प्रसिद्ध रक्तपेढी जिवनराज चेरीटेबल ट्रस्ट संचलित अहमदनगर ब्लड बँकची टिम येणार आहे.तसेच ग्रामीण रूग्णालय व ट्रामा केअर सेंटर,आष्टी ची आरोग्य तपासणी शिबिर ही यावेळी संपन्न होणार आहे.आरोग्य विभागाची टिम डॉ.‌राहूल टेकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध तपासण्या करेल व मोफत उपचारासाठी सल्ला प्रदान करेल.यावेळी उपप्राचार्य डॉ.बाबासाहेब मुटकुळे,उपप्राचार्य अविनाश कंदले,पर्यवेक्षक अशोक भोगाडे,नॅक समन्वयक निवृत्ती नानवटे,राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी व कार्यक्रम समन्वयक रवी सातभाई,महेंद्र वैरागे,प्रसिद्ध कवी सय्यद अल्लाउद्दीन,क्रिडा संचालक संतोष वनगुजरे,प्रा.अभय शिंदे हे उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभाग मेहनत घेत आहे.