राग, लोभ,अहंकार सोडून केलेले कार्य हेच खरे समाजकार्य- मंगेश मोहोड़ (सहायक पोलिस निरीक्षक)

31

🔸मालेवाडा येथे तुकडोजी महाराज पुण्यतिथि महोत्सव

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.10नोव्हेंबर):-जीवनामधे मानवाला खुप मोठा अहंकार आहे, जो व्यक्ति पैसे कमऊन मोठा झाला त्यांचे नाव इथे चालत नाही, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, डॉ, बाबासाहेब आम्बेडकर, डॉ, ऐ, पी,जे अब्दुल कलाम यानी पैसा नाही कमविला, त्यानी अहंकार सोडून समाधानाच्या पलीकडे जाऊन स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले, म्हणून तेच आज अमर झालेत असे मनोगत चिमूर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षण मंगेश मोहोड़ यांनी मालेवाडा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पुण्यतिथि निमित्त व्यक्त केले.

ब्रम्हलीन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पुण्यतिथिचा कार्यक्रम चिमूर तालुक्यात्यातील मालेवाडा येथे सम्पन्न झाला. या वेळी सहायक पोलिस निरीक्षक मंगेश मोहोड़, कृषि उत्तपन बाजार समितीचे माजी सभापती घनश्याम डुकरे, केंद्रीय कार्यकारणी सदस्य राजु पाटिल झाड़े, प्रा. चरडे सर, प्रान्त सेवाधिकारी विठलराव सावरकर, सेवाधिकारी नत्थुजी भोयर, प्रा, संजय पीठाडे, केशव वरखडे, कापसे महाराज व्यासपीठावर उपस्थित होते,कार्यक्रमाचे यशवितेकरिता गुरुदेव सेवा मंडळ मालेवाडाच्या गुरुदेव भक्तानि यानी अथक परिश्रम घेतले