दोंडाईच्यात एसटी महामंडळ कामगारांनी पुकारलेल्या संपाला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा

✒️विशेष प्रतिनिधी(संजय कोळी)

दोंडाईचा(दि.10नोव्हेंबर):- महाराष्ट्रात एसटी महामंडळ कामगारांनी पुकारलेल्या संपाला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा आहे. अनेक वर्षांपासून कामगारांच्या मागण्या रखडलेल्या आहेत. प्रत्येक वेळी एसटी तोट्यात असल्याचे सांगितले जाते, परंतु महामंडळाच्या बसेस पूर्ण भरून चालतात.त्यामुळे एसटी महामंडळ तोट्यात आहे हे मान्य होण्यासारखं नाही. ते नफ्यातच असले पाहिजे असे आम्ही गृहीत धरतो.

महाराष्ट्र शासनाने कामगारांशी बोलून त्यांचा प्रश्न तात्काळ सोडवावा व मागण्या मान्य कराव्या दोंडाईचा शहर वंचित बहुजन आघाडीने आदोंलनाला पाठिंबा दिला आहे. युवा वंचित बहुजन आघाडीचे भूपेंद्र मोहिते, फकीरा थोरात,भारतीय बौद्ध महासभेचे सुनील पवार, मक्कण माणिक, दीपक सोनवणे, प्रकाश भिडे, लखन थोरात, पृथ्वीराज पिंपळे, बाबा करणकाळ, मानव गुलाले, आकास इंदवे, दादा नगराळे, युवराज काकडे, धनराज चित्ते, सागर नगराळे विक्की पवार,
यासह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते..

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED