कांग्रेस नेते धनराज मुंगले यांची प्रदेश संघटक पदावर नियुक्ती

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.10नोव्हेंबर):-चिमूर विधानसभा मतदारसंघाचे कांग्रेसचे नेते धनराज मुंगले यांची महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे प्रदेश संघटक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

ही नियुक्ती ऑल इंडिया कांग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष ताम्रध्वज शाहू यांचे मार्गदर्शक सूचनेनुसार महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे अध्यक्ष भानुदास माळी यांनी नियुक्ती पत्राद्वारे केली.धनराज मुंगले यांचा राजकीय, सामाजिक कामातील अनुभव पक्ष संघटन वाढीस कामात येईल.

सोबतच ओबीसी वर्गाच्या समस्या राज्य स्तरावर मार्गी लावण्यासाठी मुंगले प्रयत्न करतील असा विश्वास त्यांचे चाहत्यांनी व्यक्त केला.धनराज मुंगले यांनी या नियुक्तीचे श्रेय महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानभाऊ पटोले, कॅबिनेट मंत्री ना.विजय वडेट्टीवार यांना दिले.धनराज मुंगले यांच्या नियुक्ती बद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

महाराष्ट्र, विदर्भ, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED