२२ ते २४ नोव्हेंबर रोजी तळोधी (नाईक) येथे वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची पुण्यतिथी महोत्सव आयोजित

36

✒️सुयोग सुरेश डांगे(चिमूर प्रातिनिधी)

चिमूर(दि.12नोव्हेंबर):-तालुक्यातील तळोधी (नाईक) येथे श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने दि. २२ ते २४ नोव्हेंबर या दरम्यान विविध कार्याक्रमानिशी वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची पुण्यतिथी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

दि. २२ नोव्हेंबरला सायं. ४ वाजता रामभाऊ वाकडे, मोरे यांच्या उपस्थितीत घटस्थापना होईल. त्यानंतर सामुदायिक प्रार्थना, भजन होणार आहे. दि. २२ नोव्हेंबरला घटस्थापना ग्रामसफाई, सामुदायिक ध्यान, महिलाकरिता रांगोळी स्पर्धा, हळदीकुंकू मेळावा, सायं. ६.१५ वाजता भक्तदास जिवतोडे यांचे सामुदायिक प्रार्थनेवर मार्गदर्शक होणार आहे. रात्रो ८ वाजता ह. भ. प. गजानन सूरकर महाराजांचे कीर्तन होईल. दि. २३ नोव्हेंबरला सकाळी ८ वाजता राष्ट्रासंताची पालखी मिरवणूक झाल्यानंतर मार्गदर्शनाचा कार्यक्रम होईल. त्यात महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक सदस्य पुणेचे प्रा. रवींद्र डोंगरदेव, ह. भ. प. गजानन सूरकर महाराज, केवलदास महाराज, सामाजिक कार्यकर्ते गजेंद्र चाचरकर, भक्तदास जिवतोडे, मुख्याध्यापक निखाडे, सरपंच मदनपाल येसांबरे, उपसरपंच प्रकाश धानोरकर, मुख्याध्यापिका हिवरकर आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहे.

वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची पुण्यतिथी महोत्सवाला उपस्थित राहण्याचे आवाहन श्री गुरुदेव सेवा मंडळाचे ग्रामसेवाधिकारी निलकंठ सूर्यवंशी, उपसर्वाधिकारी आशिष कावरे, सचिव उमदेव गजभे, सहसचिव सुनील खाटे, कोषाध्यक्ष अभिषेक सूर्यवंशी, संघटक सचिन वाकडे, प्रचार प्रमुख लीलेश धानोरकर, दुर्योधन खाटे, सुरज राऊत, प्रथमेश श्रीरामे, भगवान गजभे, रामभाऊ वाकडे, नानाजी वाकडे, नंदकिशोर मडावी, सुमन श्रीरामे, लीला रणदिवे, रोशनी शेंडे, धनराज डांगे आदीने केले आहे.