मेंडकी येथे चंद्रपूर जिल्हा ग्रामसभा महासंघाची स्थापना

31

🔸गावपातळीवर हक्क समित्या गठीत करून सामुहिक वन हक्क दावे दाखल करण्याची प्रक्रिया राबविली जात आहे

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.12नोव्हेंबर):-अक्षयसेवा संस्था मेंडकी या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी, सिंदेवाही सावली व नागभीड तालुक्यातील ग्रामसभांना एकत्रित करून चंद्रपूर जिल्हा ग्रामसभा महासंघाची स्थापना केली आहे.

सविस्तर असे कि, अनु. जमाती व अन्य परंपरागत वन निवासी वन हक्क मान्यता कायदा २००६ नियम २००८ सुधारणा नियम २०१२ या कायद्याची ग्रामीण भागात प्रभावी अमलबजावणी व्हावी यासाठी गेली १३ वर्षापासून संस्था काम करीत आहे. त्याकरिता प्रथम गावपातळीवर हक्क समित्या गठीत करून सामुहिक वन हक्क दावे दाखल करण्याची प्रक्रिया राबविली जात आहे. ज्या गावांना सामुहिक वन हक्क प्राप्त झाले आहेत त्या गावाचे वन व्यवस्थापन आराखडे तयार करण्याचे काम संस्था करीत आहे. ग्रामसभेच्या माध्यमातून वन उपज गोळा करणे व साठवणूक विक्री करणे, बनाचे व्यवस्थापन करण्यासाठी ग्रामसभा प्रतिनिधीना प्रशिक्षण दिल्या जाते

नुक्तेक एकारा तालुका ब्रम्हपुरी येथे पार पडलेल्या ग्रामसभा प्रतिनिधीचे सभेत या वर्षी २१ ग्रामसभांचा ग्रामसभा महासंघ तयार करण्यात आला असून महाग्रामसभेचे अध्यक्ष सुषमा मोहुर्ले, सचिव राजेश पारधी कोषाध्यक्ष तुळशीराम काटलाम त्यांची सर्वानुमते फेर निवड करण्यात आली, भेत वन हक्क कायद्यांतर्गत सामुहिक वन हक्क मान्य ग्रामसभेचे अधिकार, सामुहिक वन हक्क व्यवस्थापन समितीची कर्तव्य भूमिका व जबाबदारी, गावरतरावर अक्षयसेवा संस्थेची तांत्रिक मार्गदर्शक संस्था म्हणून निवड करणे, रोजगार हमी कायद्याचा वापर करून प्राप्त वन क्षेत्राचे व्यवस्थापन करणे, सन २०२२ ची तेंदुपत्ता संकलन व विक्री प्रक्रीया नियोजन, वनधन योजना, वन उपज आधारित प्रक्रिया उद्योग निर्माण करणे तसेच आदी बाबीवर सविस्तर माहिती देण्यात आली व चर्चा करण्यात आले.

सभेला कोरो संस्था मुंबई विभागीय समन्वयक दीपक मखडे, अक्षय सेवा संस्थेचे सचिव सुधाकर महाडोरे यांनी मार्गदर्शन केले. तर एकारा येथील सरपंच रमेश भैसारे घोट येथील सरपंच सुनंदा गावळे, जदराबोडी सरपंच देवराव उईके, तांबेगडी मेंढा सरपंच स्मितकुमार वलादे व २१ ग्रामसभेचे ६० प्रतिनिधी सभेला उपस्थित होते.तसेच कार्यक्रमाचे यशस्वीते करिता संजय मसराम, गणेश भुते, सत्यवान मडावी, सुषमा मोहुर्ले, जगदीश पुराम, तसेच एकारा येथील
सामुहिक वन हक्क व्यवस्थापन समिती व वनधन विकास केंद्राचे सदस्यांनी सहकार्य केले.