५ टक्के दिव्यांग कल्याण निधी मधील३ चाकी स्कुटर जिल्हापरीषद सदस्यांनी कार्यकर्त्यांनाच वाटल्या, लक्की ड्राॅ पद्धतीचा सामान्यांना लाभ झाला असता, दिव्यांगाची खंत

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.12नोव्हेंबर):-समाज कल्याण विभागांतर्गत असणा-या अपंग कल्याण विभागातील जिल्हापरिषद स्व: उत्पन्न ५ टक्के दिव्यांग कल्याण निधी मधुन सन २०२०-२१ मध्ये ३ चाकी स्कुटर वाटपासाठी रूपये २९ लाख रूपये एवढी तरतुद करण्यात आली होती. त्यातुन २८ लाभार्थ्यांना ३ चाकी स्कुटर वाटप करण्यात आलेली असून त्याचा एकुण खर्च ९८२४५×२८= २७५०८६० एवढा निधी खर्च करण्यात आला आहे.

सन २०१९ मध्ये ५ टक्के जिल्हापरिषद स्व: उत्पन्न दिव्यांग कल्याण निधीसाठी ९१.६४ लक्ष एवढी तरतुद ठेवण्यात आली होती व त्यामधुन ७३०७५०० एवढा निधी खर्च झाला होता, त्यामधुन दिव्यांगाच्या क्रिडा स्पर्धा १८ शाळांसाठी ५ लक्ष, ग्रामिण भागातील दिव्यांगाना पिठाची चक्की वाटप ३०,००० रू प्रमाणे६२ लाभार्थ्यांना १८६०००० रू खर्च तसेच दिव्यांगाच्या २४ शाळांना संगणक स्मार्ट टी.व्ही. खरेदीसाठी अनुदान रू ४७९५२०० तसेच दिव्यांगांच्या संकेत स्थळासाठी रू २३१५०० खर्च एकुण रूपये ७३०७५०० खर्च झाल्याचे जिल्हा समाज कल्याण आधिकारी जिल्हापरिषद बीड यांच्याकडुन सांगण्यात येते.

लक्की ड्राॅ पद्धत न वापरल्याची दिव्यांगांची खंत :- शेख जिलानी, अध्यक्ष दिव्यांग संघर्ष समिती महाराष्ट्र
_____
५ टक्के दिव्यांग कल्याण निधीतुन जिल्हापरिषद सदस्यांनी दिव्यांगाना वाटलेल्या ३ चाकी स्कुटर त्यांच्या मर्जीतील कार्यकर्त्यांनाच वाटल्या असल्याने सर्वसामान्य दिव्यांगाना त्याचा लाभ मिळाला नाही, जर लक्की ड्राॅ पद्धतीचा अवलंब स्कुटर वाटपासाठी करण्यात आला असता तर काही प्रमाणात गोरगरीब आर्थिक दुर्बल घटकांना त्याचा लाभ मिळाला असता अशी खंत दिव्यांग संघर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्ष शेख जिलानी यांनी बोलुन दाखवली.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED