किल्ले बनवा स्पर्धेत स्पर्धकांनी जिंकली सर्वांंची मने

36

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.13नोव्हेंबर):-दिपावली निमित्त शंभुसूर्य मर्दानी खेळ प्रशिक्षण संस्थेच्या वतीने तालुक्यात किल्ले बनवा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ दि.९ नोव्हेबर २०२१ रोजी पार पडला.
या स्पर्धेमध्ये प्रदुम्न भाऊसाहेब डोके याने प्रथम क्रमांक ३००१ रु.,विशाल काकासाहेब डोके व्दितीय क्रमांक २००१ रु.तर सुमित सतिष रंधवे याने तृतीय क्रमांक १००१ रुपयांचे बक्षीसे पटकावले आहेत.सर्व सहभागी स्पर्धकांस ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष उपसरपंच बापूसाहेब डोके,प्रमुख पाहुणे म्हणून शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थान नगर जिल्हा प्रमुख अरुण (बापू) ठाणगे,अमोल शिंदे,राजेंद्र कुलकर्णी,संजय जोशी,पै.बालाजी जरे,पै.बापू जरे,रामदास देशपांडे हे उपस्थित होते.तालुक्यातील मातकुळी येथे शंभुसूर्य मर्दानी प्रशिक्षण संस्थे अंतर्गत दिपावली निमित्त दर वर्षी किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.या ही वर्षी किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते दि.१ नोंव्हेबर ते ४ नोव्हेंबर २०२१ कालावधीत स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची मोफत नाव नोंदणी करण्यात आली.या स्पर्धेत आष्टी तालुक्यातील २० विद्याथ्र्यांनी सहभाग नोंदवला होता.स्पर्धक विद्यार्थ्यांनी स्वत: घरी किल्ला बनवून नोंदणीमध्ये मिळालेला टोकण क्रमांक बनवलेल्या किल्यासमोर लिहलेला होता.

विषेत: थर्माकोल व प्लास्टीकचा वापर न करता ही किल्ले बनवा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.दि. ७ नोव्हेंबर रोजी डॉ.एकनाथराव मुंडे,विठ्ठल डोके,बबलु (वस्ताद) टेकाळे,रोनीत खुपसे यांच्या मार्गदर्शनाखाली बनवलेल्या किल्यांचे परिक्षकांकडून परिक्षण करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांनी किल्याबद्दलची माहिती सांगितली.विद्यार्थ्यांनी प्लास्टीक व थर्माकोल विरहीत आकर्षक व सुंदर किल्ले बनवून परिक्षकांची मने जिंकली.

शंभुसूर्य मर्दानी खेळ प्रशिक्षण संस्थेच्या वतीने तालुक्यातील मातकुळी येथे विद्यार्थ्यांना दांडपट्टा,तलवारबाजी,लाठी-काठी,
मल्लखांब या विद्येचे तसेच आरोग्यासाठी व्यायाम,योगासने यांचे मोफत प्रशिक्षण दिले.या स्पर्धेत शत्रुघ्न जरे,रेणुका डोके,साक्षी धोत्रे,ज्ञानेश्वरी धनवे,सुमित रंधवे,वैष्णवी डोके,प्रदुम्न डोके,विशाल डोके,गणेश धोंडे,श्रेयस भराटे,प्रदीप गायकवाड,तुनुष्का देशपांडे,पराग मेहेरकर,अशुतोष दहिफळे,श्रध्दा ससाणे आदी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.आयोजित स्पर्धेसाठी तिरुमला मल्टीस्ट्रटचे असोसिएट कॉन्सलर सचिन श्रीखंडे,पै.बालाजी जरे,कृष्णा क्लीनीकल लॅबचे संचालक संकेत खिळे व शिलादीप हॉस्पीटल जामखेड यांचे सहकार्य लाभले.