भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने स्पदंन विनकरे यांचा सत्कार

🔸स्पंदन विनकरे हा अनुसूचित जाती मधुन निट परिक्षेत देशात १११ वा

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.13नोव्हेंबर):-दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा दिग्रसच्या वतीने स्पदंन श्याम विनकरे निट परिक्षेत अनुसूचित जाती मधुन देशात १११ वा आल्याबद्दल व त्याने ६३९ गुण घेऊन घवघवीत यश मिळविल्याबद्द त्यांच्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस त्याला शुभेच्छा देण्यात आल्या.

या सत्कार सोहळ्याला भारतीय बौध्द महासभा तालुकाध्यक्ष विनायक देवतळे, सरचिटणीस एकनाथ मोगले, कोषाध्यक्ष रमेश वहीले, उपाध्यक्ष यशवंत भरणे, माजी अध्यक्ष देविदास खंदारे, संघटक पुरुषोत्तम मेश्राम, सल्लागार प्रा .त्रिपाल राहूलगडे व त्यांचे आई-वडील तसेच ईत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र, शैक्षणिक, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED