हिंदू हृदय सम्राटांचा मरणोत्तर दारुण पराभव करणारे, लोकनेते दि बा पाटील साहेब

25

शिवसेनेच्या हिंदुत्वासहित,हिंदू हृदय सम्राट,शिवसेनाप्रमुख बाळासासाहेब ठाकरे यांचा नवी मुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण वादात, मरणोत्तर दारुण पराभव करणारे, लोकनेते दि बा पाटील साहेब.मागासवर्गीय ओबीसी, एससी ,एसटी ,स्त्रिया यांच्या शोषित जातींना न्याय देण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रमाणेच प्रत्येक जातींच्या नेतृत्वाची, वर्तमान अपरिहार्यता?शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव मा उद्धवजी ठाकरे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी असताना,आपल्या वडिलांचे नाव नवी मुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पास द्यावे असा हुकूमशाही प्रस्ताव नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ठेवला.सीकेपी मराठा उच्चवर्णीय नेतृत्वाची युती महाराष्ट्रातील,सुसंस्कृत राजकिय परंपरा विसरून, राजकीय दृष्ट्या किती असंस्कृत,निर्लज्ज वागू शकतात? याचे हे वर्तमानातील मनुवादी उदाहरण होय.शिवसेना म्हणजे जळते, पेटलेले हिंदुत्व! आगरी कोळी कराडी भंडारी हेही आक्रमक हिंदूच.मग स्वतः हिंदू असलेले,शिवसैनिक असलेले लोक मा बाळासाहेब ठाकरे यांना विरोध करतीलच कशाला?दाढी वाढवून वाघ बनलेल्या सर्वच हिंदू विचारवंतांचे हे “गृहीतक” पराभूत करण्याची ताकद, मृत्यूनंतरही लोकनेते दि बा पाटील यांच्या विचारात आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासारख्या सरंजामी मराठयांचे,सामान्यांचे (हिंदूंचे)शोषण हेच तत्वज्ञान असते.महाराष्ट्रवर कायम क्षत्रिय मराठ्यांची राजकीय सत्ता असताना, मराठा जातीचे सामान्य (हिंदु )स्वातंत्र्या नन्तर “मागासवर्गीय” ठरले, हे त्यांच्यातील शोषक मनुवादी वृत्तीचे दुसरे उदाहरण शोधून सापडणार नाही.
आरक्षण या कुबड्या आहेत.असे म्हणवून मुबंई तल्या आगरी कोळी भंडारी यांच्या खांद्यावर उभे राहून सत्ता मिळविणाऱ्या शिवसेना प्रमुखांच्या बनवेगिरीला मनुही लाजला असेल.आज सामाजिक दृष्ट्या मागास नसलेल्या मराठा समाजाला मागास वर्गीय आरक्षण देण्यासाठी मा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निर्लज्जपणे पुढे येतात?. ही ओबीसी आगरी कोळ्यांची फसवणूक आहेच परंतु आम्ही ठाकरे सीकेपी अस्सल वैदिक हिंदुत्ववादी (ब्राह्मणी) आहोत ही जगजाहीर झालेली गोष्ट आहे.

या परिस्थितीत आपल्या संविधानिक हक्क अधिकारांसाठी नेहमीच अज्ञानी ,बेसावध असलेल्या ओबीसी आगरी कोळी कराडी भंडारी सागरपुत्र समाजाला पुन्हा शतमूर्ख बनविण्यासाठी ,हे ठाकरे नामकरण षडयंत्र एकनाथ शिंदे आणि सिडको एमडी संजय मुखर्जी यांनी उभे केले.या प्रकरणात ठाणे रायगड,पालघर मुबंई परिसरात जे जनआंदोलन पेटले त्यात हिंदुत्व वादी शिवसेनेस ओबीसी सागरपुत्रांसमोर,त्यांच्या “मुबंई” बाले किल्य्यातच पराभव पत्करून, गुढगे टेकावे लागले.अत्यन्त ऐतिहासिक अशा या नामकरण वादाचे विश्लेषण आजही महाराष्ट्रात झालेले नाही.राज्यस्तरावरचे हिंदुत्ववादी राजकारण करणाऱ्या शिवसेनेस आणि राष्ट्रीय हिंदुत्वाचे समर्थक भाजपा साठी ही फार मोठी चपराक आहे.”देव न माननारा देव माणूस” अशी उपाधी दै लोकमत ने दि बा पाटील यांच्या मृत्यू नंतरच्या बातमीत छापली होती.अर्थात देव न माननारे चार्वाक बुद्ध महात्मा जोतिबा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर हे दिबांचे वैचारिक आदर्श होते.

आपल्या देशात देव न मानणारे. देव,आत्मा,स्वर्ग,चमत्कार,भुते यांना नाकारणारे विचारवन्त “ही” होते?. हे सांगण्याची हिम्मत फार मोजक्या लोकांमध्ये आहे.हे सारे धार्मिक बंडखोर हिंदूंचे पंथ आणि मांडलिक विचारवन्त आहेत! असे सांगून त्यांना नाकारण्याची “चूक” न करता, अक्षरशः अजगराच्या नीतीने गिळले जाते.तेहतीस कोटी देव पूजेच्या, धर्म नीतीने हिंदू जगभरात ओळखले जातात .मग देव नाकारणारे लोकनेते दि बा पाटील (ओबीसी) हे ही हिंदूच असतील ? तर त्यांच्या नावाला शिवसेने सारखे हिंदुत्ववादी विरोध का करतात?. आकाशातील मुक्ती कडे बोट दाखवून ,जमिनीच्या पुत्राला म्हणजेच भूमी पुत्राला,मानवाला उपाशी ठेवणारा धर्म आणि देव “दि बांनी” नाकारला.यात चुकीचे काहीच नव्हते ! आणि नाही.हे शहाणपण सर्वच लोकांनी स्वीकारले तर ते नक्कीच सुखी होतील ही गोष्ट लोकनेते दि बा पाटील यांनी आपल्या यशस्वी जीवनातून सिद्ध केली आहे.कोळी समाजाचे नेते भाऊसाहेब राऊत,ज्येष्ठ विधिद्न्य Adv दत्ता पाटील याच विचारसरणीचे नेते होते. ओबीसी जातींच्या या नेतृत्वाची ओळख सांगू शकतील असे वारसदार त्यांना आपल्या समाजात लाभले नाहीत.म्हणून सत्य लपत नाही.नवी मु विमानतळ नामकरण प्रकरणात सिडको सारखी पैसेवाले,मीडिया खरेदी करणारे महामंडळ आणि शिवसेना महाविकास आघाडी,पराभूत करण्याची ताकद ज्या निसर्ग न्यायात आहे तो न्याय म्हणजे दि बा पाटील.

एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारणात ओबीसी जातींचे नेतृत्व करणारा शेतकरी कामगार पक्ष्याच्या विचारपीठावर दि बा पाटील पुढे आले.पनवेल नगर पालिकेचे नगराध्यक्ष,पनवेल उरण मतदार संघातून चार वेळा आमदार,महाराष्ट्राच्या विधान सभेचे विरोधीपक्ष नेते, भारताच्या लोकसभेत दोनदा खासदार म्हणून प्रतिनिधित्व,देशांतील ओबीसींचे नेते,संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात त्यांनी एक वर्षे कारावास भोगला होता.ही राष्ट्रीय ओळख असतानाही त्यांनी येथल्या स्थानिक आगरी कोळी कराडी प्रकल्पग्रस्ताना न्याय देण्यासाठी पाच हुतात्मे देऊन स्वतः चे रक्त त्यागून 1984 ला सिडको विरुद्ध फार मोठं आंदोलन केले.आज नवी मुबंई परिसरात येथील सागरपुत्र ओबीसींचे जे अस्तित्वच नव्हे तर राजकीय वर्चस्व,सामाजिक न्यायाचे प्रतीक असलेले स्वभाव वैशिष्ट्य दिसतेय, त्याचे शिल्पकार लोकनेते दि बा पाटील आहेत.यात हिंदू असणे आणि शिवसैनिक असणे याचा काडीचाही वाटा नाही. तरीही बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा आग्रह धरणारे किती स्वार्थी मूर्ख होते हे ईथल्या जागृत जनतेने सिडको विरुद्ध लढून सिद्ध केलंय.

वैदिक हिंदुत्वाच्या प्रचार प्रसाराने सत्ता कशी मिळवायची? मनुस्मृतीच्या लाडक्या बालकांना ब्राह्मण क्षत्रिय वैश्य याना सर्वाधिकार द्यायचे.स्त्रिया,ओबीसी एससी एसटी यांचे कायम शोषण करायचे. या हिंदू चक्र युहास भेदनारा योद्धा भगवान बुद्धांतर एकच झाला.त्यांचे नाव डॉ भीमराव रामजी आंबेडकर.डॉ बाबासाहेब आंबेडकर.

डॉ बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे राष्ट्रीय नेतेच नाहीत, तर अखिल विश्वातील क्रमांक एकचे विद्वान आहेत.तरीही ज्या मागास अस्पृश्य जातीत ते जन्मले, त्या बांधवांचा त्यांनी केलेला उद्धार हा देशातील समस्त मागास जातींच्या पुढाऱ्यांनी न चुकता घ्यावा असा नेतृत्वाचा खरा आदर्श आहे.लोकनेते दि बा पाटील हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आचरणात आणलेले नेते होते. अर्थात खोती विरोधी आंदोलनात मिळालेले जे यश नारायण नागु पाटील यांना मिळाले होते तेच यश सिडको विरोधी आंदोलनात दि बा पाटील यांनी मिळविले. असे यश,देव माननाऱ्या कोणत्याच आगरी कोळी भंडारी कराडी ओबीसी आमदार खासदार नगरसेवक याना मिळाले नाही. अर्थात आम्ही मनुस्मृतीचे गुलाम आहोत मागास आहोत याला मनुस्मृती माननारा देव आणि धर्म जबाबदार असेल तर त्याचीही चिकित्सा करणारे लोकच भारतीय संविधान आणि त्याला अनुकूल नवे कायदे बनवू शकतात.ओबीसी एससी एसटी या मागास वर्गीयांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या बौद्ध बांधवांची प्रगती त्यांच्या प्रत्यक्ष सहवासात जाऊन अभ्यासावी.बौद्ध स्त्रियांचे साक्षरतेतील प्रमाण,देशातील हिंदू जातींच्या शिक्षण साक्षरतेचा आणि बौद्ध बांधवांचा शिक्षण साक्षरतेतील वाटा हा सर्वच मागास जातींना आदर्श ठरावा. अर्थात एक दूरदृष्टी असलेले नेतृत्व आपल्या जातीसह देशालाही कुठे नेऊ शकते हे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षमय जीवनाने आम्हा 85 टक्के मागास वर्गीयांसाठी दिलेली मोठी देणगी आहे.या प्रवासात लोकनेते दि बा पाटील हे सागरपुत्र आगरी कोळी भंडारी कराडी ओबीसींना एका दिपस्तंभा सारखे नेते आहेत.जे आम्हाला मनुस्मृतीच्या अंधारातून लोकशाहीच्या संविधानिक प्रकाशाचा मार्ग दाखवू शकतात.

✒️सुलोचनापुत्र.राजाराम पाटील(अध्यक्ष आगरी समाज शेतकरी प्रबोधिनी)मो:-८२८६०३१४६३