सत्ताधारी पक्षातील सभापती पुत्राचे न.प. विरोधात उपोषण

🔸न.प.च्या गलथान कारभाराची ऐतिहासिक नोंद…प्रा पवन मुंडे.

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)

परळी(दि.18नोव्हेंबर):-शहरातील नगरपालिका प्रशासनाने गलथान पणाचा कळस गाठला असून आता तर सत्ताधारी पक्षातील शिवसेना सभापती पुत्र तथा शिवसेना तालुका प्रमुखाना उपोषनाला बसण्याची वेळ आली आहे, ही परळीच्या इतिहासातील दुर्दैवी घटना असल्याची टीका भाजपा नगरसेवक प्रा पवन मुंडे यांनी केली आहे.शहरात नगरपालिकेच्या भ्रष्ट कारभारा मुळे शहराच्या सर्वांगीन विकासात अडथळा निर्माण झाला असून ,शहराची निरस व बकाल अवस्था नगरपालिकेच्या गलथान कारभारा मुळे झाली आहे. 100 कोटींच्या बोगस गटार योजनेच्या नावाखाली शहरातील सर्वच चांगले रस्ते फोडले असून त्या मुळे नागरिकांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे.

त्याच बरोबर जिकडेतिकडे दुर्गंधी पसरल्याने नागरिक वेगवेगळ्या आजारांना बळी पडत आहेत तसेंच घरकूल योजनेत सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून त्याची पण चौकशी होण्याची गरज आहे ,नगरपालिका नागरिकांच्या सुविधे साठी आहे का सत्ताधार्यांचे खिसे भरण्यासाठी साठी आहे असा सवाल नागरिक विचारात आहेत ? आणि आता तर चक्क नगरपालिकेच्या सत्ताधारी पक्षातील सभापती पुत्र तथा शिवसेना तालुका प्रमुख यांनाच नगरपालिकेच्या ढिसाळ कारभारा विरोधात उपोषणाला ला बसण्याची वेळ आल्याचे ही परळीच्या इतिहासातील सर्वात दुःख घटना असल्याची टीका भाजपा नगरसेवक प्रा पवन मुंडे यांनी केली आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED