कोरोना संसर्गामुळे विधवा झालेल्या महिलांसाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घ्यावा :- सामाजिक कार्यकर्ते श्री बाजीराव ढाकणे

34

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.19नोव्हेंबर):– कोरोना संसर्गामुळे विधवा झालेल्या महिलांसाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेऊन त्यांचे पुनर्वसन करावे अशी मागणी कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे राज्य निमंत्रक आदरणीय हेरंब कुलकर्णी आणि बीड जिल्हा समन्वयक, श्री बाजीराव ढाकणे यांनी अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे साहेब यांची भेट घेऊन चर्चा केली.या भेटीत त्यांनी बीड जिल्ह्यात जवळपास ३००० लोक कोरोना संसर्गामुळे मयत झालेले आहेत. यामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबातील मोठ्या प्रमाणात महिला विधवा झाल्यामुळे त्यांचे तात्काळ सर्वेक्षण करून त्यांच्या समस्या समजावून घेत या महिलांच्या रोजगारासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडुन पुढाकार घ्यावा अशी विनंती केली.

यावेळी हेरंब कुलकर्णी यांच्यासोबतच्या शिष्टमंडळात बीड जिल्हा समन्वयक बाजीराव ढाकणे, नवनाथ नेहे, उपस्थित होते. अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी अनाथ मुलांसोबतच विधवा महिलांच्या पुनर्वसनाबाबत तात्काळ प्रशासन पुढाकार घेईल असे सांगितले.

या महिलांसाठी सध्या अस्तित्वात असलेल्या योजनांची अंमलबजावणी करू असे सांगत बचत गटाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
या चर्चेत अप्पर जिल्हाधिकारी ठोंबरे यांनी विधवा महिलांसंबंधीचे सर्व विषय गांभीर्याने समजावुन घेत योग्य निर्देश दिले जातील असे सांगितले.

विधवांच्या प्रश्नासाठी तालुकास्तरावर वात्सल्य समिती स्थापन झालेल्या आहेत. परंतु या समितीच्या बैठकाच होत नाहीत असे हेरंब कुलकर्णी यांनी निदर्शनाला आणून दिले. त्यावर या समितीला सक्रिय करण्याबद्दल स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. त्याच बरोबर या महिलांना वारसा हक्क मिळण्याबाबत प्रशासन पूर्ण सहकार्य करील व रोजगाराच्या बाबतीत विविध पर्याय कौशल्य विकास विभागाचे सोबत चर्चिले जातील. असे त्यांनी सांगितले तसेच जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांच्या कडून कोविड १९ च्या बालसंगोपन योजनेची आत्तापर्यंत किती प्रकरणे मंजूर झाली आहेत याची माहिती घेऊन जिल्ह्यातील एकही बालक बालसंगोपन योजने पासून वंचित राहणार नाही. या योजनेचे कोरोनात विधवा झालेल्या महिलांना कुटुंब चालवताना नक्कीच उपयोग होईल असे प्रयत्न केले जातील असे ठोंबरे साहेब यांनी सांगितले.

कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे बीड जिल्हा समन्वयक बाजीराव ढाकणे यांनी कोरोना संसर्गामुळे एक किंवा दोन पालक गमावलेल्या मुलांसाठी जे.एम.फाऊंडेसेन च्या वतीने सर्वेक्षण करून या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचे सांगितले.बीड जिल्ह्यातील शेतकरी व कष्टकरी वर्गातील अधिक मृत्यू झाल्यामुळे या कुटुंबातील महिलांना कौशल्याचे प्रशिक्षणाची यांच्यासाठी स्वतंत्र योजना आणण्याची आवश्यकता आहे अशी मागणीही कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे बीड जिल्हा समन्वयक बाजीराव ढाकणे यांनी केली आहे.