मांडवा येथे काकडा आरतीची समाप्ती

26

🔸मांडवा येथे किर्तनाने झाली काकडा आरतीची सांगता

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.20नोव्हेंबर):-आषाढी एकादशी ते कार्तिक पौर्णिमा पर्यंत दररोज सकाळी काकडा आरती ,भजन चालू असते .त्यानंतर कार्तिकी पौर्णिमेला काकड्याची समाप्ती होते.यादरम्यान सकाळी टाळ,मृदुंग ,हरिनामाच्या गजरात दिंडी निघत असते. दिंडी एका महिन्याची, पंधरा दिवसाची किंवा पाच दिवसाची काढतात असाच प्रकारे पुसद तालुक्यातील मांडवा येथे चाळीस ते पन्नास वर्षापासून काकडा आरतीची परंपरा आहे .

परंतु कोरोणाची परिस्थिती लक्षात घेता यावर्षी पाच दिवसाची काकडा आरती ,दिंडी ही टाळ,मृदुंग हरिनामाच्या गजरात श्री.समर्थ नागोजी महाराज यांच्या देवस्थानापासून गावातील मुख्य मार्गाने रोज सकाळी पाच वाजता काढण्यात आली होती . दिंडी येण्याच्या अगोदर गावातील महिला अंगणात सडा-सारवण ,रांगोळी काढून येणाऱ्या दिंडीचे काकड्याचे पूजन करतात आणि नंतर काकडा आरतीचे हरिनामाच्या गजरात चार महिने सुरू असलेल्या बाराअभंगांच्या भेरीची भक्तिमय वातावरणात आज दिनांक १९ नोव्हेंबर रोजी काकडा आरतीची समाप्ती करण्यात आली .

या समाप्तीनंतर श्री .समर्थ नागोजी महाराज देवस्थान येथे भोजनाच्या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.दि.१८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ८वाजता ह.भ.प खंडुजी महाराज सांडवेकर यांचे किर्तन पार पडले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री .समर्थ नागोजी महाराज भजनी मंडळ आणि समिती तसेच गावातील समस्त नागरिकांनी अथक परिश्रम घेतले.